आंतरराष्ट्रीय विकासात दक्षिण कोरियाचा सिंहाचा वाटा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 18 December 2019

जगामध्ये शुण्यातून निर्माण झालेली अनेक राष्ट्रे आपण पाहिली आहे, त्यातच एक नाव म्हणजे दक्षिण कोरिया. आपल्या महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाइतका असलेला हा देश विकासाच्या बाबतीत संपुर्ण भारत देशाला मागे टाकतोय, हे फक्त मी ऐकलं होतं, पण एका भेटीदरम्यान ते पाहायलाही मिळालं. दक्षिण कोरियाला भेट देण्याची संधी मला मिळाली होती. त्या भेटीदरम्यान अनेक गोष्टींचा उलघडा झालाच, पण उत्तर कोरियासारख्या अन्वस्त्रांची धमकी देणाऱ्या विरुध्द राष्ट्रांच्या बाजूला असूनही दक्षिण कोरियाने केलेली प्रगती ही सर्वोत्तम आहे, हे नक्की. अशाच या दक्षिण कोरियाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

जगामध्ये शुण्यातून निर्माण झालेली अनेक राष्ट्रे आपण पाहिली आहे, त्यातच एक नाव म्हणजे दक्षिण कोरिया. आपल्या महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाइतका असलेला हा देश विकासाच्या बाबतीत संपुर्ण भारत देशाला मागे टाकतोय, हे फक्त मी ऐकलं होतं, पण एका भेटीदरम्यान ते पाहायलाही मिळालं. दक्षिण कोरियाला भेट देण्याची संधी मला मिळाली होती. त्या भेटीदरम्यान अनेक गोष्टींचा उलघडा झालाच, पण उत्तर कोरियासारख्या अन्वस्त्रांची धमकी देणाऱ्या विरुध्द राष्ट्रांच्या बाजूला असूनही दक्षिण कोरियाने केलेली प्रगती ही सर्वोत्तम आहे, हे नक्की. अशाच या दक्षिण कोरियाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

संपूर्ण जगात आज एका देशाची मात्र सातत्याने चर्चा होताना दिसत आहे, तो म्हणजे दक्षिण कोरिया. हा देश सध्याच्या स्थितीत जगातील एक महासत्ताक देश म्हणून समोर येत आहे. आशिया खंडातील चौथ्या तर जगामध्ये बाराव्या क्रमांकाचा श्रीमंत देश म्हणून आज दक्षिण कोरियाची मोठी ओळख आहे आणि त्याची कारणेही तशाप्राकरे आहेत, हे संपूर्ण जगाने मान्य केलं आहे. या देशाची आर्थिक व्यवस्था संपूर्णपणे निर्यातीवर अवलंबून आहे. मोटार वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड यंत्रे अशाप्रकारच्या अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभे राहाणारा व्यवसाय म्हणजे या देशाच्या विकासाचा पाया समजला जातो. लोकशाहीच्या मार्गाने चालणारा हा देश लोकसंख्येने, क्षेत्रफळाने कमी असला तरी आज संयुक्त राष्ट्रे, आर्थिक सहयोग, विकास संघटना व जागतिक व्यापार संघटना इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे. संयूक्त राष्ट्राच्या सरचिटणीसपदी 'बान की मून' आहेत, जे दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत.

फक्त कोरिया या नावाने ओळखला जाणाऱ्या प्रदेशाची दुसऱ्या माहायुध्याच्यावेळी फाळणी झाली आणि 1948 साली लोकशाही सरकार असलेला स्वातंत्र दक्षिण कोरिया या देशाची निर्मीती झाली. या देशात कधी लोकशाही तर कधी राष्ट्रपती राजवटीने कारभार सांभाळावा लागतो. तरीही मागील 30 वर्षांमध्ये दक्षिण कोरियाचे रुपांतर एका हारलेल्या, गरिब, लढाईतून बाहेर फेकलेल्या आणि अविकसित राष्ट्रापासून एक श्रीमंत व महासत्ताक राष्ट्रात झाले आहे, हे नक्की.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने दक्षिण कोरिया हा देश 100,210 चौरस किमी इतका आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने फक्त 1/3 इतका हा देश आहे. 2012 च्या जनगणनेनुसार  देशात 5 कोटी 4 हजार 441 इतकी लोकसंख्या आहे. ही लोकसंख्या महाराष्ट्राच्या सध्याच्या लोकसंख्येपेक्षा आर्धी आहे, त्यामुळे देशाने आणि तिथल्या सरकारने प्रगतीमध्ये केलेली भरभराट ही सर्वोत्तम मानली जातेय.

उत्तर कोरिया किम जोंग उन या हुकुमशहाच्या अंमलाखालील राष्ट्र आहे. ईशान्य भारतीयांची शारीरिक ठेवण प्रामुख्याने चीनी, जपानी आणि कोरियन वळणाची आहे. शास्त्रीय परीभाषेत या शारीरिक ठेवणीला मंगोलाईड म्हणतात, असं जरी असलं तरी मात्र दक्षिण कोरियामध्ये याच्या विरुध्द वातावरण आहे. लोकशाही पध्दतीने इथे सत्ता असल्याने अनेक गोष्टींना वाव मिळतो. आयातीपेक्षा या देशाचं व्हीजन अनेक गोष्टी तसेच वस्तूंच्या निर्यातीवर असल्याने हा देश भरभराटीला येत आहे. इथली शैक्षणिक स्थितीही तेवढ्याच प्रमाणात समजून घेणे गरजे आहे. 

जगातल्या अनेक देशांमध्ये शिक्षण व्यवस्थेला घेऊन दक्षिण कोरिया 9 स्थानावर आहे. सरकारी शांळांसोबतच इथे खाजगी शाळांचा समावेश असला तरी खासगी शाळांच्या प्रमाणात सरकारी शाळांना अनुदान जास्त दिलं जात. दक्षिण कोरिया राज्यशास्त्र, गणित आणि विज्ञान या तीन विषयांवर सरकारी शाळांमध्ये भर दिलाल जातो. जगाच्या पाठीवर व्यवहार करण्यासाठी इंग्रजी विषयाची प्राथमिकता आणि जबरदस्तीचे शिक्षण इथल्या सरकारी शाळांमध्ये केले जाते. त्यामुळे इथल्या शैक्षणिक गणवत्तेतील टक्केवारी 5.1 टक्के आहे. जी फक्त एकट्या महाराष्ट्रामध्ये 2.5 टक्के इतकी आहे, त्यामुळे हा देश सद्यस्थितीत विकसंशिल देश म्हणून गणला जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News