चिन देशापासून सुरू झालेली चहाची निर्मीती आज देशभरात पसरली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 15 December 2019

पुणे : सकाळी उठल्यावर चहा पिऊन तरतरीत होऊन कामाला सुरुवात करायची आणि संध्याकाळी चहाच्या घोटानेच दिवसभराचा थकवा घालवायचा, हा अनेकांचा दिनक्रम. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चर्चा या चहासोबतच रंगतात. चहा मेंदूला तरतरी व शरीराला ऊर्जा देतो. त्याचसोबत आरोग्यासाठी लाभदायक असल्याने सगळ्यांच्याच पसंतीस उतरतो. काळानुरूप या चहामध्ये बदल होत गेले; पण लोकांचे चहावरचे प्रेम कधीच कमी झाले नाही. 

चहा म्हणजे अबालवृद्धांचं आणि खास करून आपल्या भारतीयांचं लाडकं पेय. ज्याच्याशिवाय आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही, असं हे पेय. दैनंदिन जीवनात मानाचं स्थान असलेल्या या पेयाचा सन्मान म्हणून जगभरात आज (15डिसेंबर ) चहा दिन साजरा होतोय. अर्थातच, या दिनाच्या पार्श्‍वभूमीवर कपभर चहाची जगभर चर्चा झाली नाही तर नवलच! 

पूर्वी बाहेर चहा प्यायचा म्हणजे टपरी अथवा टपरीवजा चहाचे दुकान किंवा एखादे हॉटेल. आता मात्र कॉफी हाउससारखी "टी हाउस' ही संकल्पना लोकप्रिय ठरताना दिसत आहे. चहाचे अनेक प्रकार आहेत. दहा रुपयांच्या कटिंगपासून दोनशे रुपयांपर्यंतचा चहा "टी हाउस'मध्ये मिळतो. साधा चहा तसेच आले, वेलची, मसाला, इराणी हे चहाचे प्रकार तर सगळ्यांनाच माहीत आहेत. या व्यतिरिक्त कश्‍मिरी, दार्जिलिंग, तिखट, तुळस, केशर, गुलकंद, संत्रा, जास्वंद, बेरीज, पेपरमिंट, ब्लॅककरंट, व्हॅनिला असे अनेक फ्लेवर्सचे चहा "टी हाउस'मध्ये उपलब्ध असतात. त्याचसोबत ग्रीन टी, लेमन टी, आइस टी, गुळाचा चहा असे आरोग्यदायी पर्यायसुद्धा आहेतच. चहासोबतच सॅंडविच, बर्गर, पास्ता, वॅफल्स असे खायचे पदार्थदेखील मिळतात म्हणून तरुणाई "टी हाउस'कडे विशेष आकर्षित होत आहे.

आता चहाप्रमाणे कॉफीलादेखील ग्लॅमर प्राप्त होत आहे. अनेक जण चहाकडे "रिफ्रेशमेंट' म्हणून बघतात, त्यामुळे निवांत बसून चहाचा आस्वाद घेण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे, म्हणून "टी हाउस'ला अनेकांची पसंती मिळत आहे. चहाचे विविध फ्लेवर्स चाखण्यासाठी ग्राहक गर्दी करतात. 
- प्रियंका बोरकर 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News