21 वर्षीय काझी आनिक इस्लामकडून 'या' गुन्ह्याची कबुली 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज काझी आनिक इस्लामवर दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे.

ढाका : बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज काझी आनिक इस्लामवर दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. 2018 मध्ये डोप टेस्ट अयशस्वी झाल्याबद्दल त्याच्यावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) बंदी घातली आहे. त्याची दोन वर्षांची बंदी 8 फेब्रुवारी 2019 पासून सुरू झाली असून फेब्रुवारी 2021 मध्ये बंदीचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर तो सक्रिय क्रिकेटमध्ये दाखल होईल. याआधी नॅशनल क्रिकेट लीगदरम्यान बंदी घातलेला पदार्थ मेथमॅफेटामाईनमध्ये तो सकारात्मक आढळला.

21 वर्षीय काझी आनिक इस्लामने या गुन्ह्याची कबुली दिली. "बोर्डाने अनिकच्या बाबतीत दोष लक्षात घेता त्याचे वय आणि अनुभवाची कमतरता विचारात घेतली, खरं म्हणजे त्याच्या खेळातील कामगिरी वाढवण्यासाठी त्याने हे केले नाही, जेव्हा त्यास यासंदर्भात कळवण्यात आले, तेव्हा त्याने हा आरोप स्वीकारला, असे बीसीबी बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, काजीने 2018 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्‍वकरंडकात बांगलादेशकडून प्रतिनिधित्व करताना सर्वाधिक विकेट्‌स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त चार प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये अनिकने 15 विकेट्‌स घेतल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News