शिवाजी महाविद्यलयाच्या मानवी हक्क विभागाने 63 निबंधाने बाबासाहेबांना अभिवादन  

विना जाधव, उमरगाव
Monday, 9 December 2019

येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मानवी हक्क आणि मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

उमरगा - येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मानवी हक्क आणि मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मानवी हक्क' या विषयावर 63 विद्यार्थ्यांनी निबंध लिहून 63 व्या महापरिनिर्वाण दिनी  त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे शब्दांकन करून अभिवादन केले.

यावेळी महाविद्यालयाच्या मानवी हक्क विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांना लोकराज्य हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विशेषांक दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी आपल्या अध्यक्ष समारोपात  मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अभ्यासावे आणि त्यांच्या विचाराचे मंथन करावे असे आवाहन केले.

यावेळी मानवी हक्क विभागाचे समन्वयक आणि उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे उपप्राचार्य प्रा. डी. व्ही. थोरे, डॉ. एस. पी. इंगळे, डॉ. एस. टी. तोडकर, प्रा. एस. पी. पसरकल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News