प्राजक्ता मुतेला सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते माई पुरस्काराने सन्मानित

निखिल ठाकरे, हिंगणघाट
Wednesday, 4 December 2019

वर्धा - सेवाव्रत बहुउद्देशीय संस्था नागपूर, महर्षी मार्कडेश्वर संस्था नांदेड यांच्या वतीने दिला जाणारा माझी माई पुरस्कार ओंजळ बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका कु. प्राजक्ता मुते यांना अनाथांची कैवारी जेष्ठ समाजसेविका माननीय सिंधुताई सपकाळ यांच्या शुभ हस्ते सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे बुधवार दिनांक 27 रोजी दुपारी 2 वाजता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

व्यासपीठावर माननीय दक्षिण नागपूर चे आमदार मोहनजी मते, तरुण भारत सी. ई. ओ. सुनील कुहिकर, सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकण्या सीमा राऊत, ग्रामगिताचार्य अनिल विठ्ठलवार, सविता मोहिते, मारोती गुंडेवार उपस्थित होते. 

तसेच कविसंमेलन व 'मी माईची वेडी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेल्या कविसंमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातील कवि, समाजसेवक, सांस्कृतिक, साहित्यिक, कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यामधे महाराष्ट्रातील धडाधडीचे समाजकार्य करणाऱ्या लोकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

त्यामधे वर्धा जिल्ह्यातील शायनिंग स्टार कोचिंग क्लासेस च्या संचालिका प्राजक्ता मुते यांनासुद्धा माई पुरस्काराने सन्मानित करून सत्कार करण्यात आला, वर्धामध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना धडे देऊन समाज सेवेचा ठसा उमटविला. प्राजक्ता मुते या 7 वर्ष झाले. त्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करीत आहे 

सोबतच नवीन नवीन उपक्रम आणि निःशुल्क उन्हाळली शिबिर घेऊन वर्धा जिह्लात सामजिक कार्य करीत  आहे. 21 व्या शतकामध्ये युवा पिढी वेग वेगवेगळ्या वळणाला लागली आहे. तीच युवा एक मुलगी महहुन समाजासाठी आदर्श ठरत आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल कु. प्राजक्ता मूते यांचे सर्व स्तरांतून विशेष अभिनंदन होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News