MBBS नंतर २ वर्षाचा PG डिप्लोमा कोर्स; पदव्युत्तरची आवश्यकता नाही, MCIचा महत्वपुर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ६ ऑगस्ट 2020 रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढले होते. त्यामध्ये बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अंतर्गत आठ वैद्यकीय शाखांमध्ये दोन वर्षाचा पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती दिली.

नवी दिल्ली : एमबीबीएस नंतर विद्यार्थ्यांना दोन वर्षाचा पीजी पदविका कोर्स करण्याचा नवा आदेश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि भारत सरकारने दिला. जे विद्यार्थी एमबीबीएस नंतर पीजी करण्यासाठी उत्सुक नाहीत किंवा ज्यांना पीजी करणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारने दोन वर्षाचा पीजी पदविका कोर्स तयार केला. दरवर्षी पीजीच्या पन्नास हजार जागेसाठी दीड लाख विद्यार्थी अर्ज करतात, त्यातून ५० हजार उमेदवारांची निवड पीजीसाठी होते आणि एक लाख विद्यार्थी पीजी विना तसेच राहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारने दोन वर्षाचा पदविका कोर्स सुरू केला आहे. याचा फायदा वैद्यकीय क्षेत्रातील हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाने ६ ऑगस्ट 2020 रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढले. त्यामध्ये बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अंतर्गत आठ वैद्यकीय शाखांमध्ये दोन वर्षाचा पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती दिली. गुरुवारी (ता. 20) देशातील वैद्यकीय तज्ज्ञांचा वेबिनार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सरकारने सुरू केलेला पीजी डिप्लोमा कोर्स विषयी अधिक माहिती देण्यात आली. वैद्यकीय तज्ज्ञांनी सरकारचे अभनंदन केले आणि नवीन कोर्सचा  विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले.

ग्रामीण भागात आजही वैद्यकीय विशेष तज्ज्ञ उपलब्ध नाहीत, त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. छोट्या आजारासाठी रुग्नांना शहरची वाट धरावी लागते. रुग्णांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी ग्रामीण भागात विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे, ही गरज भरुन काढण्यासाठी पीजी डिप्लोमा महत्त्वाची भुमिका बजावणार आहे.  शंभरपेक्षा अधिक बेड आणि विशेष तज्ञ डॉक्टर असणाऱ्या खाजगी किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये विद्यार्थ्यांना पीजी डिप्लोमा कोर्स करता येईल अशी माहिती मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News