महाजॉब्स पोर्टलवर आठवड्याभरातच 2 लाख 16 हजार 807 इच्छुकांची नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 July 2020

टाळेबंदीनंतर नोकरीच्या शोधात असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना आपल्या कौशल्यानुसार रोजगार व कंपन्यांना कामगार उपलब्ध व्हावेत, या दुहेरी हेतूने महाजॉब्स या पोर्टलची निर्मिती एमआयडीसी व राज्याच्या उद्योग विभागामार्फत करण्यात आली.

मुंबई: टाळेबंदीनंतर नोकरीच्या शोधात असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना आपल्या कौशल्यानुसार रोजगार व कंपन्यांना कामगार उपलब्ध व्हावेत, या दुहेरी हेतूने महाजॉब्स या पोर्टलची निर्मिती एमआयडीसी व राज्याच्या उद्योग विभागामार्फत करण्यात आली. नोकरी मिळविण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी आपली वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक तपशील, कामाचा अनुभव, कौशल्याबाबतचा तपशील व अधिवास प्रमाणपत्र इत्यादी संपूर्ण माहिती नोंदवावी, असे आवाहन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन यांनी केले आहे. यामुळे उद्योजकांना अपेक्षित असलेले कौशल्यधारक कामगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, असेही अनबलगन म्हणाले.

टाळेबंदीनंतर कंपन्यांना आवश्‍यक कुशल, अर्धकुशल, अकुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्यासाठी महाजॉब्स या पोर्टलची निर्मिती केली गेली आहे. त्याचे नुकसेच उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या आठवड्याभरातच 2 लाख 16 हजार 807 इच्छुकांनी नोकरी मिळविण्यासाठी नोंदणी केली आहे; तर एकूण 1 हजार 631 कंपन्यांनी आवश्‍यक कौशल्यानुसार मनुष्यबळाची मागणी नोंदविली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News