ऑनलाईन शिक्षणासाठी आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांकडून २ कोटी ३५ लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 July 2020

संचालक प्रा. सुभाषिश चौधरी यांच्या आवाहनाला माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

मुंबई : आयआयटी मुंबईने नवीन शैक्षणिक सत्राचे पहिले सत्र ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेत असलेले आर्थिक वंचित घटकातील विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधने उपलब्ध नाहीत. या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, इंटरनेट डेटा प्लान देण्यासाठी निधी द्यावा, असे आवाहन मुंबईचे संचालक प्रा. सुभाषिश चौधरी यांनी माजी विद्यार्थी, तसेच उद्योग क्षेत्राला आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आयआयटी बॉम्बे हेरिटेज फाऊंडेशन या माजी विद्यार्थांच्या संघटनेने तब्बल दोन कोटी 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नवीन शैक्षणिक वर्षाचे ऑफलाईन वर्ग सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यानुसार आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाषिश चौधरी यांनी ऑफलाईन वर्ग भरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नवीन शैक्षणिक वर्षाला विलंब होऊ नये यासाठी संस्थेने ऑनलाईन वर्ग सुरू करण्यावर भर दिला आहे. आयआयटी मुंबईत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आर्थिक वंचित घटकातून येतात. त्यांच्यासाठी निधी देऊन डिजिटल गॅप कमी करण्याचे आवाहन संचालकांनी केले होते. यासाठी संस्थेला अशा विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉप, इंटरनेट डेटा प्लान देण्यासाठी निधी उभारण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी माजी विद्यार्थी तसेच उद्योग क्षेत्राला आवाहन केले होते. या आवाहनला प्रतिसाद देत आयआयटीचे माजी विद्यार्थी संकटकाळात धावून आले आहेत.

परदेशातील देणगीदारांकडून आयआयटी बॉम्बे हेरिटेज फाऊंडेशनने दोन कोटी 35 लाखांचा निधी उभा केला आहे. या निधीतून 500 विद्यार्थांना लॅपटॉप, इंटरनेट डेटा प्लॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माजी विद्यार्थांनी सुमारे 50 टक्के निधी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थांना पुढील सत्राच्या ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहता येणार आहे.
- प्रा. सुभाषिश चौधरी, संचालक, आयआयटी मुंबई.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News