1 वर्ग, विद्यार्थी 12 कशी होणार JEE- NEET परीक्षा? जाणून घ्या संपुर्ण नियोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020

जेईईची मुख्य परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान तर 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा होणार आहे.

नवी दिल्ली : पालक व विद्यार्थ्यांचा विरोध झुगारून नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NEET) नॅशनल एलिजिबिलिटी कम इंट्रन्स टेस्ट आणि (JEE) जॉईन इंट्रन्स एक्झाम घेण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी परीक्षा स्थळाची निवड, बैठक व्यवस्था, सामाजिक अंतराचे नियम, विद्यार्थ्यांची वैद्याकीय तपासणी, त्यासाठीची नियमावली ठरवण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी तयारी केल्याची माहिती दिली एनटीएने दिली.  

जेईईची मुख्य परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान तर 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा होणार आहे. जेईईच्या मुख्य परीक्षेसाठी देशभरातून 9 लाख 53 हजार विद्यार्थी बसणार आहे तर नीटसाठी 15 लाख 97 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा केंद्र वाढवण्यात आली. जेईईसाठी पूर्वी 570 केंद्र होती आता 660 करण्यात आली तर नीटसाठी पुर्वी 2 हजार 546  केंद्र होती, आता 3 हजार 843 केंद्र करण्यात आली. जेईई मुख्य परीक्षा ऑनलाइन संगणकावर होणार आहे तर नीट ही परीक्षा ऑफलाईन पेन्सिल एमसीक्यू पद्धतीने होईल अशी एनटीएने प्रसिद्धपत्रकात जाहीर केली.

बैठक व्यवस्था

जेईईची मुख्य परीक्षा आठ सत्रात गेतली जाणार होती. त्यासाठी प्रत्येती सत्रात देशभरातील 1 लाख ३२ हजार विद्यार्थी बसणार होते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्राची संख्या वाढवण्यात आली आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यात आली, आता एका सत्राला 80 हजार विद्यार्थी बसणार आहेत आणि बारा सत्रात परीक्षा होणार आहे. जेईई मुख्यसाठी एक बाक सोडून दुसऱ्या बाकावर विद्यार्थी बसवण्यात येणार आहेत तर नीटसाठी एका वर्गात बारा विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. पूर्वी ही संख्या 24 होती. तसेच विद्यार्थ्यांना शारीरिक अंतर पाळण्याचे नियम बंधनकारक करण्यात आल्याची माहिती एनटीएने दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News