#DeepakChahar या खतरनाक खेळाडूमुळे भारत मालिकाविर बनला

यिनबझ टीम
Monday, 11 November 2019

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला बांगलादेश आणि भारत यांच्यातली मालिका अखेर भारताच्या विजयाने संपूष्टात आली आहे. या मालिकेत भारताचा 2-1ने विजय झाला असून शेवटच्या सामन्यात भारताच्या दीपक चहरने आपली कामगिरी चोख पाळली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला बांगलादेश आणि भारत यांच्यातली मालिका अखेर भारताच्या विजयाने संपूष्टात आली. या मालिकेत भारताचा 2-1ने विजय झाला असून शेवटच्या सामन्यात भारताच्या दीपक चहरने आपली कामगिरी चोख  बजावली आहे.

काल झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकाच्या मदतीने भारताची धावसंख्या 174 पर्यंत पोहोचली होती, तर त्याचा पाठलाग करत बांगलादेश फक्त 144 धावापर्यंत मजल मारू शकला, या सामन्यात दीपक चहरने विकेट्सची पहिली हॅट्ट्रिक बजावली. संपूर्ण सामन्यात 3.2 षटकांत फक्त 07 धावा देत 06 बळी त्याने आपल्या नावावर केले आहेत. 

पहिल्या दोन सामन्यामध्ये सरस ठरणारे रोहित शर्मा आणि  शिखर धवन मात्र या सामन्यात आपली भुमिका बजावू शकले नाहीत, मात्र त्यांच्यानंतर आलेल्या अय्यर आणि राहूल या जोडीने महत्वाची भुमिका बजावली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News