जाणून घ्या अयोध्या प्रकरण; तेही थोडक्यात

यिनबझ टीम
Saturday, 9 November 2019

1992 पासून राममंदिर प्रकरण प्रलंबित आहे. नियमित सुनावणी होणार असल्याचा अहवाल शासनाकडून करण्यात आला होता. राम मंदिर प्रकरण संवेदनशील असल्यामुळे अयोध्येमध्ये 10 डिसेंबर 2019 पर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं होता. तब्बल 200 शाळा दोन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

1992 पासून राममंदिर प्रकरण प्रलंबित आहे. नियमित सुनावणी होणार असल्याचा अहवाल शासनाकडून करण्यात आला होता. राम मंदिर प्रकरण संवेदनशील असल्यामुळे अयोध्येमध्ये 10 डिसेंबर 2019 पर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं होता. तब्बल 200 शाळा दोन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नक्की काय आहे राम मंदिर प्रकरण :
 अयोध्येतील वादग्रस्त जागेवर प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्याची धारणा आहे. १५ शतकात प्रभु रामचंद्रांचं मंदिर पाडून त्याजागी बाबरी मशीद उभारली गेली असाही आरोप आहे. 

१८५३ मध्ये हिंदू संघटनांनी 'राम मंदिर पाडून या ठिकाणी बाबरी मशीद उभारली' असा आरोप केला. त्या आरोपाचा परिणाम असा की देशात पहिल्यांदाच या आरोपावरून हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगल झाली. त्यांनतर थेट १८८५ मध्ये पहिल्यांदाच हे प्रकरण न्यायालयाच्या दारात पोहचले.

"महंत रघुबरदास यांनी फैजाबाद येथील न्यायालयात राम मंदिरात निर्मितीसाठी आवाहन केलं." 

23 डिसेंबर 1949 रोजी जवळपास 50 हिंदूनी मशिदीच्या केंद्रस्थानी प्रभू रामचंद्रांची मूर्ती ठेवली, त्यानंतर हिंदू बांधव पूजा करू लागले, मात्र मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करणे बंद केलं.

त्यानंतर 16 जानेवारी 1950 रोजी गोपाल सिंह विशारद यांनी फैजाबाद न्यायालयात आवाहन करून रामलीलाच्या पूजेसाठी विशेष परवानगी मागितली.

5 डिसेंबर 1950 रोजी महंत रामचंद्र दास यांनी हिंदुनी प्रार्थना सुरू ठेवावी यासाठी आणि मशिदीत रामाची मूर्ती ठेवण्यासाठी तक्रार दाखल केली.

1984 मध्ये विश्व हिंदू परिषदेने बाबरी मशिदीचा कुलूप उघडण्या संदर्भात आणि राम जन्मभूमीची जागा स्वतंत्र करण्यासाठी एक मोहीम सुरू केली. या जागेवर एक भव्य मंदिर उभारले जाईल ही घोषणा तेव्हा देण्यात आली.

१८८६ मध्ये फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी वादग्रस्त जागेवर हिंदू बांधवांना पूजेची संमती दिली, कुलूप उघडण्यात आले मात्र मुस्लीम बांधवांनी बाबरी मशिद अक्शन कमिटीची स्थापन केली. 

1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातच्या सोमनाथ पासून अयोध्यापर्यंत एक रथयात्रा काढली, त्यानंतर दंगली कोसळल्या.

6 डिसेंबर 1992 मध्ये हजारो सेवकांनी अयोध्येत पोहोचत बाबरी मस्जिद पाडली त्यानंतर जातीय दंगली उसळल्या. त्यावर घाईने तात्पुरत्या स्वरूपात मंदिर तयार करण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News