सिध्दहस्त लेखक रत्नाकर मतकरी यांच्या ब्लाइंड गेमचा शुभारंभ दणक्यात साजरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 8 November 2019

मुंबई - मराठी नाटय रसिकांना बऱ्याच काळानंतर एक नितांत सुंदर थरारनाट्याची अनुभूती मिळाली, रत्नाकर मतकरी लिखित ब्लाइंड गेम या नाटकाच्या शिवाजी मंदिरात झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, एका हलक्याफुलक्या रविवारी घरात खेळीमेळीच्या वातावरणात सर्वजण आनंदात वावरत असताना अचानक विकृत मनोवृत्तीतून कपट कारस्थान सुरू होते. 

तीन सैतानांचा जीवाशी खेळ सुरु होतो आणि मग प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढत जाते, नाटकाच्या शेवट पर्यंत ही उत्कंठा ताणली जाते, रसिक प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते, रसिकांना बऱ्याच काळानंतर एक रंजक, थरार आणि संपूर्ण नाट्यानुभव मिळाला. विशेष म्हणजे वयाची एक्क्याऐंशी गाठलेल्या लेखक नाटककार रत्नाकर मतकरी यांची उपस्थिती यावेळी होती. नाटकाला लाभलेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना ते म्हणाले की," हे नाटक अन्य थरार नाटकांपेक्षा वेगळे आहे. 

या नाटकात घटना एकापाठोपाठ घडत नाहीत तर त्यातील पात्रे नायिकेची मनोभूमिका तयार करताना दिसतात. मात्र त्यानंतर नाटकात वाढत जाणारी गुंतागुंत तासरच उत्कंठा रहस्य आणि रोमांच पाहायला मिळते ही रसिकांना थराराची वेगळीच मेजवानी असल्याचे मतकरी यांनी यावेळीं सांगितले.

नाटकातील कलावंतांनी आपल्या कसदार अभिनयाने रसिकांची मने जिंकली, नाटकाचे दिग्दर्शन अनील खोपकर यांनी केले आहे तर थराराची अनुभूती देणारे संगीतसंयोजन  तेजस चव्हाण यांनी केले, श्याम भुतकर यांच्या नेपथ्याने नाटकाच्या भव्यतेत भर घातली, तर दीपक रेगे, डॉ. संजीव कुमार पाटील, नेहा नाईक, आशुतोष नेर्लेकर,  भाग्यश्री देसाई या कलावंतांनी आपल्या बहारदार अभिनयाने नाटकाच्या संहितेला आणि दिगदर्शनाला न्याय दिला. तर राहूल जोगळेकर यांच्या प्रकाश योजनेने नाटकातील थरार अधिक गडद केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News