Related News
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. निवेदने आणि ट्वीटमुळे ते नेहमी चर्चेत असतात....
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप Donald Trump यांच्या ताफ्याला मधले बोट दाखवणारी महिला स्थानिक कार्यालय निवडणुकीत निवडुण आली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय बनली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप Donald Trump यांच्या ताफ्याला मधले बोट दाखवणारी महिला वर्जिनिया स्थानिक कार्यालय निवडणुकीत Virginia Local Office Elections निवडून आली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय बनली आहे.
28 अक्टोबर 2017 रोजी जूली ब्रिस्कमैन Julie Briskman ही तिच्या निवासी ठिकाणी सायकलवरून प्रवास करत असताना तिच्या जवळून डोनाल्ड ट्रंप यांचा ताफा जात होता. त्यावेळी जूलीने त्या ताफ्याला आपले मधले बोट दाखवले होते. तो फोटो जगभरात व्हायरल झाला होता. या कारनाम्यामुळे जूलीला आपली नोकरीदेखील गमवावी लागली होती. त्यानंतर खूप मेहनतीच्या जोरावर तिला एका बड्या कंपनीत पुन्हा नोकरी मिळाली होती.
या सगळ्या प्रकारानंतर वर्जिनिया स्थानिक कार्यालय निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या बाजूने जूली उभे राहिल्या होत्या, तर त्यांच्या विरुध्द रिपब्लिकन पार्टीचा उमेदवार निवडणूक लढण्यासाठी उभा होता. या निवडणूकीत जूली बहुमताने निवडून आल्या.
निवडणून जिंकल्यानंतर जूली यांनी सांगितले की 2017 च्या घटनेचा माझ्या विजयाशी काहीही संबंध नाही. मी फक्त महिलांचे अधिकार, ट्रांस्पोर्टेशन आणि पर्यावरणाचे अनेक मुद्दे घेऊन निवडणून लढली आहे. जे मुद्दे मी निवडणूक लढवताना मांडले होते, त्याचा पूर्णपणे अवलंब मी माझ्या पूढील कार्यपध्दतीत करणार आहे.
का दाखवले होते मधले बोटJulie Briskman, proving there's more than one way to say f**** you!#RunForOffice https://t.co/x6FzPxOLws
— Indivisible EurekaSp (@IndivisEurekaSp) November 6, 2019