फेसबूक वापरण्या आधी नवीन Rules, Like, Comment आणि Logo बद्दल जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 6 November 2019

व्हॉट्स अॅपनंतर जर संवादाचं लोकप्रिय सोशल मीडिया साधन कोणतं असेल; तर ते फेसबूक म्हणून ओळखलं जात. अशा अगळ्यावेगळ्या आणि सर्वांना हव्याहव्या वाटणाऱ्या फेसबूकने आपल्यात काही बदल केले आहेत, जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

फेसबूकने गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. म्हणजेच फेसबूकने पोस्ट शेड्यूलचा पर्याय गायब केला असल्याचे प्रामुख्याने दिसून येते. 

फेसबूकने आपल्या लोगोमध्ये बदल केले असल्याचेदेखील घोषित केले आहे. सध्या काही दिवसांसाठी हा बदल GIF च्या माध्यातून फेसबूक युजर्सच्या समोर येणार आहे, तर हा लोगो मुव्हिंग स्वरूपातदेखील असणार असल्याचे म्हटले जाते. व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्रामची एक प्रमुख कंपनी म्हणून दर्शवण्यासाठी हा लोगो प्रदर्षित केला जाणार आहे. कंपनीचे मार्केटिंग आणि त्याच्या प्रोडक्टची ओळख व्हावी म्हणून या लोगोचा वापर होणार आहे.

सध्या फेसबूक आपल्या एका नव्या प्लॅटफॉर्मची जाहिरात करण्यात व्यस्त असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे फेसबूक त्याच्या वापरकर्त्यांसाठी एक नवे फिचर लॉंच करत आहे. फेसबूक वापरणाऱ्या सगळ्यांसाठी फेसबूकच्या माध्यमातून जगभरातल्या काही महत्वाच्या बातम्या वाचता येणार आहेत.

फेसबूकने काही अशा खास ट्रिक्स त्याच्या वापरकर्त्यांसाठी दिल्या आहेत, की ज्याची अजून त्यांना माहितीही नाही, त्या स्ट्रिक्स जाणून घेण्याचा प्रयत्नदेखील यावेळी आपण करू...
आपल्याला येणारे बर्थ डे नोटिफिकेशन्स बंद करणे, जास्त पोस्ट करणाऱ्या फ्रेंड्संना स्नूज करणे, फेसबूक डेटा डाऊनलोड करणे, ऑनलाईन स्टेटस इतरांपासून लपवणे अशा अनेक स्ट्रिक्स तुमच्यासाठी फेसबूकने खूल्या केल्या आहेत, ज्याची सोय तुम्हाला त्याच्या सेटिंग्समध्ये केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News