गडकरी रंगायतन येथे "पु. ल. साग्रसंगीत" सोहळा संपन्न 

आदित्य येवले
Wednesday, 6 November 2019

पु.ल देशपांडे यांच्या साहित्यातून जितकं शिकावं तितकं कमीच.
 

पराग प्रतिष्ठान प्रस्तुत, अभिजित कांबळी दिग्दर्शित, पु. ल. देशपांडे यांचा जन्म शताब्दी सोहळा "पु. ल. साग्रसंगीत" या नावाने 2 नोव्हेंबर रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे पार पडला. एक अप्रतिम हाऊसफूल प्रयोग म्हणून घोषितदेखील झाला. या संगीत सोहळ्यात मनमोहक संगीत, नृत्य आणि नाटक सादर करण्यात आले. 

 या सोहळ्यात "व्यक्ती आणि वल्लीतील काही व्यक्तीरेखा नारायण, सखाराम गटणे सादर केल्या" तसेच म्हैस या नाटकातील उस्मान शेठ ह्या विनोदी पात्राचे काही भागही यावेळेला सादर करण्यात आले.

लहान मुलामुलींनी 'नाच रे मोरा' या गाण्यावर खूप छान नृत्य केले. गुळाचा गणपती सिनेमामधील इथेच टाका तंबू तसेच त्या दिसावडाकडे हे कोकणी गीत विशाल कांबळी ह्यांनी खूप प्रभावीपणे सादर करून वन्समोर मिळवले. यावेळी इंद्रायणी काठी, कबिराचे विणतो शेले, माझे जीवन गाणे इत्यादी गाणी सादर करण्यात आली. जवळपास 100 कलावंतांनी मिळुन हा कार्यक्रम सुशोभित केला होता. गोल्टविंग आर्ट इनस्टिट्यूट मधील लहान-मोठे कलाकारही कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पु. ल. देशपांडे यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने अशाप्रकारे एक अनोखा अप्रतिम कार्यक्रम संपन्न झाला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News