190 लोकांवर तरुणाने केला बलात्कार; न्यायाधीश झाले हैरान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 January 2020
  • जानेवारी 2015 ते मे 2017 या कालावधित 190 पेक्षा अधिक लोकांना दारु पाजून आणि ड्रग्स देऊन बेशुद्ध करायचा, त्यानंतर अमानवीय कृत्य करुन बलात्कार करायचा

अविकसीत आणि विकसनशील देशात अन्याय, अत्याचाराचे प्रमाण अधिक असते अशी ओरड दरवेळी केली जाते. मात्र, विकसीत देशातही नागरिकांवर अत्याचार होतो हे ब्रिटनमध्ये झालेल्या घटनेवरुन सिद्ध होते. एका तरुणाने 190 पेक्षा अधिक लोकांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लंडन येथील मॅनचेस्टर शहरात घडली. या बलात्काराच्या घटनेमुळे संपुर्ण देश हादरला आहे. कठोर कायदे करुनदेखील बलात्काराच्या घटना कमी होत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

जानेवारी 2015 ते मे 2017 या कालावधित 190 पेक्षा अधिक लोकांना दारु पाजून आणि ड्रग्स देऊन बेशुद्ध करायचा, त्यानंतर अमानवीय कृत्य करुन बलात्कार करायचा. विशेष म्हणजे आरोपीचा फक्त दोन खोल्यांचा फ्लॅट होता. त्या फ्लॅटमध्ये आरोपीने सर्व पिडीतांवर बलात्कार केला होता. पोलिसांनी छापा टाकून आरोपीच्या घराची झडती घेतली. यावेळी घरात आश्चर्यचकीत करणाऱ्या वस्तू सापल्या. अनैसर्गिक कृत्यांचे फोटो, दारुच्या बाटल्या, ड्रग्स, ब्लेड, इंजेक्शन, रक्ताचे डाग मिळाले. 

बलात्कार करताना आरोपीला पोलिसांनी कोर्टात हजर केले, युकेच्या न्यायालयात बलात्काराची केस चालू होती. या नराधमास कोर्टाने 'मोस्ट वाँटेड रेपिस्ट' म्हणून संबोधलं. न्यायाधीशांनी आरोपीस 30 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर 'आरोपी हा अत्यंत धोकायादक तरुण आहे. समाजाला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो' त्यामुळे कोर्टानं सोडून देण्यास नकार दिला. आजपर्यंतच्या इतिसाहात प्रथमच अशा प्रकारचा गुन्हा आमच्या समोर आला आहे. अस मत न्यायाधीशांनी नोंदवलं. कोर्टानं जलद गतीने निर्णय दिल्यामुळे सर्व आरोपींनी कार्टाचे आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News