मुलींच्या लग्नासाठी १८ व्या वर्षाची सक्ती योग्य आहे का?

रसिका जाधव
Thursday, 13 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • भारतात आपल्या खूप मोठ्या प्रमाणात भारतीय संस्कृती जपली जाते.
  • मुलींचे लग्नासाठी १८ वर्षपूर्ण आणि मुलांचे २१ वर्षपूर्ण असले की, लग्न लावलून दिले जाते.
  • मुलीचे १८ व्या वर्षी लग्न करणे म्हणजे त्या मूलीच्या आयुष्यात आपण अनेक अडचणी निर्माण करतो.

भारतात आपल्या खूप मोठ्या प्रमाणात भारतीय संस्कृती जपली जाते. मुलींचे लग्नासाठी १८ वर्षपूर्ण आणि मुलांचे २१ वर्षपूर्ण असले की, लग्न लावलून दिले जाते. मुलीचे १८ व्या वर्षी लग्न करणे म्हणजे त्या मूलीच्या आयुष्यात आपण अनेक अडचणी निर्माण करतो. ही परंपरा अजून ग्रामीण भागात दिसून येते. आई-वडिलांना जरी लवकर लग्न नसेल करायचे तर नातेवाईक असताना ते म्हणतात वयात आली पोर लग्नाच बघतात की,  नाही कुठे असे टोमणे नातेवाईक मारतात. या प्रथेमुळे मुलीचे शिक्षण पूर्ण होत नाही म्हणजे तिला स्वालंबी होता येत नाही. काही घरात मुलगी स्वत: सांगते की, मला पुढे शिकायचे आहे, आई-बाबा मला एवढ्या लवकर नका पाठवू सासरी त्यावर आई-वडिलांच उत्तर एकच असत ते म्हणजे लिहिता वाचता येतना तेव्हढे शिक्षण घेतले खूप झाल. तस पण तुला नवऱ्याच्या घरी जाऊन भांडीच खासायची आहेत हे उत्तर त्या मुलीला एकायला मिळते. काही वडिल असतात ते म्हणतात पुढील शिक्षण तू तुझ्या नवऱ्याच्या घरी जाऊन पूर्ण कर आणि तेव्हा मुलांकडचे पण तिच्या पुढील शिक्षणासाठी तयार असतात. परंतु नंतर ते तिला पुढे शिक्षण घेऊन देत नाहीत. वयाच्या १८ वर्षी तिने तिच्या हात पुस्तक घेऊन प्रगती करायची तर, त्याच हाता पुस्तक नसून संसाराचा गाढा सांभाळावा लागतो. हे कुठेतरे थांबले पाहिजे, मुली पण पूर्णपणे अधिकार आहे शिक्षण घेण्याचा हो आणि ती शिक्षण घेऊन नंतर लग्न केल्यानंतर सुध्दा नोकरी आणि संसार सांभाळत असते. अजून ही काही ठिकाणी मुलीचं १८ वर्षे झाले की, त्यांचे लग्न लावून दिलं जातं. त्यामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहतात हे कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

कितपत योग्य आहे यावर विचार करण्यापेक्षा हे योग्य नाही या मतावर ठाम राहणे जास्त गरजेचं आहे, आणि याला विरोध करणं ही खूप जास्त महत्वाचे आहे. अनेक ठिकाणी स्त्री पुरुष समानता ही फक्त बोलण्यापूर्तीच राहिली आहे. पण आजच्या जगात स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने समाजात कार्यरत आहेत. जर मुलींचं लग्न वयाच्या १८ व्या वर्षी केलं तर त्यांना हवं तेवढं शिक्षण घेता येणार नाही. या वयात मुलींमध्ये हवा तेवढा समंजसपणा नसतो. लग्नानंतर त्यांच्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या येतात. लग्नानंतरही अनेक मुलींना शिकण्याची इच्छा असते पण वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना शक्य होत नाही. आजची पिढी एकमेकांवर अवलंबून राहत नाही. त्यामुळे मुलींना शिक्षण घेण आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहणे हे खूप महत्वाचे आहे.

श्रध्दा ठोंबरे

अजुनही काही ठिकाणी मुलींची लग्न वयाच्या १८ व्या वर्षी करण्यात येते. काही लोकांची मानसिकता तशी असते मुलगी वयात आली लवकर लग्न उरकुन ताकावे किती दिवस ठेवणार,  पण ते लोक भविष्याचा विचार करत नाहीत,  मुलीला स्वताच्या पायावर खंबीर पणे उभे करावे आणि एकदा लग्न झाले की, सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या वर पडतात त्यामुळे मनात असताना ही शिक्षणाकडे दुर्लक्ष होत तिथेच तीला थांबाव लागते.

पण काही ठिकाणी बापाकडे मुलीच लग्न लावून देण्याशिवाय मार्ग नसतो. त्याला त्याचाच उदरनिर्वाह करता नाकी नऊ येतात मग तो कुटुंबाच रक्षण कस करेल? तो गरीब पिता गरिबीमुळे मुलीच लग्न लवकरच करुण टाकतो. काही वेळा तर मुलींना आई वडील नसल्या कारणाने लवकर लग्न करावी लागतात. त्याने ही शिक्षणावर परिणाम होतो. पण सांगायचं एकच आहे पित्याच्या गरिबीमुळे जरी लग्न लवकर झालेलं असेल तर तिच्या सासरच्यानी तीला शिक्षणा साठी स्पोर्ट करावा तिल पुढे जाण्यास बळ द्यावं..

पायल पोटभरे

खरतर मुलींनी शिक्षण घेणे हे फार गरजेचे आहे. कोणतीही अडचण आल्यास मुली स्वतःच्या पायावर नीट उभ्या राहू शकतात. त्यांना कोणाच्या आधाराची गरज भासणार नाही. तसेच लग्नानंतरही मुलींवर खुप जबाबदारी असते आणि काही मुलींना घरातील सर्व गोष्टी पाहायला लागत म्हणून मुलींनी लग्ना आधीच आपले शिक्षण पूर्ण करणे फार गरजेचे आहे. तसेच शिक्षण पूर्ण न करता लवकर मुलीचे लग्न केल्यास मुलींना काही अडचणीच्या वेळेस शिक्षण नसल्यामुळे अनेक परिणामांना सामोरे जावे लागते. म्हणून १८ व्या वर्षी मुलींची लग्न करणे हे अयोग्य आहे

कोमल साळुंखे

मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर लगेच तीच लग्न लावून देने हे खूप चुकीचे आहे. कारण वयाच्या १८ व्या वर्षी मुलींमध्ये पाहिजे तेवढा समंजसपणा आलेला नसतो,  आणि लग्नानंतर तर त्यांना मोठमोठ्या जबाबदऱ्याना सामोरे जावे लागते. त्यामुळे मुलीच्या भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. तिला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करून मगच तिचे लग्न केले पाहिजे. कारण लग्नानंतर भविष्यात येणाऱ्या अडचणींना ती बिनधास्त सामोरे जाऊ शकेल. काही मुलींची आईवडिलांनाच्या घरची परिस्थिती कमकुवत असते. तिची शिक्षणाची इच्छा असूनही तिचे लग्न लावून दिले जाते तेव्हा अशा वेळी सासरच्या माणसांनी त्या मुलींना आधार देऊन तिचे शिक्षण पूर्ण केले पाहिजे.

आजच्या काळात कोणतीही व्यक्ती एकमेकांवर अवलंबून नाहीये. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेणे ही आजच्या काळाची गरज आहे, शिक्षणामुळेच आज मुली पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आजच्या काळात मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मुलींना शिक्षण देणे खूप गरजेचे आहे,  त्यांना त्यांच्या पायावर खंबीर उभे करणे आजच्या काळाची खरी गरज आहे.

शिल्पा नरवडे

जेव्हा मुलगी लहान असते तेव्हा तिला काही कळत नसत पण ती जस जशी माहीत मिळत जाती तस तसे तिला सर्व कळत जात. पूर्वी बाल विवाह केला जात होता म्हणजेच मुलगी ६-७ झाली की, लगेच त्या मुलींचे लग्न केले जायचे नंतर हळू हळू समाज सुधारत गेला आणि नंतर लग्नाची अट ही १८ वर्षावरील ज्या मुलींच वय झालं असेल अश्या मुलीचं लग्न करण्यास परवानगी दिली.

शाळा बंद झाल्याने सर्व मुले/मुली घरी आहेत. यातील अनेक मुलींची शाळा कायमची बंद होण्याची भीती असते. ज्या मुली वसतिगृहांमध्ये राहत होत्या आणि तिथून आपापल्या घरी परतल्या आहेत, त्यांचे पुन्हा शाळेत जाणे मुश्किल आहे. अनेक कुटुंबांचे उत्पन्न कमी झाले आहे किंवा संपूर्ण बंद झाले आहे,  त्यामुळे पोट भरणे आधी. मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य एरवीही नसते,  असते तरी आता ते शक्य नाही.

भारतातील काही गावांमध्ये शाळाच नाहीत,  या गावांमधील मुला-मुलींना दुसरीकडे जावे लागते. ७०% हून लांब मुलांची शाळा २ किमी वा त्याहून खुप लांब आहे,  त्यांना त्यासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. काही गावामध्ये तर आणखी बस सेवा नाही. त्या सुरू होतील तेव्हा विचार केला तर मुलींना बस पकडून शाळेला जाणे कठीण दिसते. अनेक मुलींना घरातील कोणी पुरुष दुचाकीवरून शाळेत सोडायला जात होते, तेही आता अशक्य होईल असे चित्र आहे. बहुतांश मुलींकडे सायकली नाहीत त्यामुळेही त्यांची शाळा बंद होण्याची भीती आहे. तसे पाहता आता काही परिस्थिती सुधारत आहे काही सोई सुविधा उपलब्ध होत आहेत. पण काही राजकीय पक्ष्यांच्या लोकांमुळे ज्या ठिकाणी चांगले काम होत ते पण नाही होत आपण पाहिले तर जास्तीत जास्त पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये जास्त प्रमाणत आज ही बालविवाह होत आहे.

मुलींचे लवकर लग्न लावून देण्यामागे दारिद्र्य हे सगळ्यात मोठे कारण आहे. तसेच बालविवाहाचे प्रमाण शिक्षणाचा अभाव असलेल्या आणि ग्रामीण भागात अधिक दिसून येते. आजही कित्येक समाजांमध्ये मुलींना मुलापेक्षा महत्त्व कमी आहे, त्यामुळे त्यांना शाळेत पाठवले जात नाही आणि लवकर लग्न लावून दिले जाते. ज्या घरांमध्ये गरिबी आहे कारण रोजगार नाही, शिक्षण नाही, तिथेही हीच परिस्थिती. या अहवालात असे नमूद केले आहे की मुलींच्या शिक्षणाचे एक वर्ष वाढले, म्हणजे त्यांना आणखी एक वर्ष शिकू दिले तर त्यांचे लग्नाचे वय थोडे तरी पुढे जाते. म्हणजेच मुलींना शिकवण्याचा हाही फायदाच, परंतु तरीही कोट्यवधी मुली आजही शाळेत नाहीत.

महेश सोरटे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News