'या' कारणामुळे १७९ प्रोफेशनल महाविद्यालये बंद; फार्मसी, आर्किटेक्चरच्या १ लाख ९ हजार जागा रद्द

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने यंदा १७९ प्रोफेशनल महाविद्यालये बंद केली. त्यात अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यायलयांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : देशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एकिकडे नवीन महाविद्यालये सुरु केली जात आहेत. तर दुसरीकडे सुरु असलेले व्यवसाईक महाविद्यालये बंद केली जात आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने यंदा १७९ प्रोफेशनल महाविद्यालये बंद केली. त्यात अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यायलयांचा समावेश आहे. त्याचबरोबर फार्मसी, आर्किटेक्चरच्या १ लाख ९ हजार जागा कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

देशातील १३४ महाविद्यालयांच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे महाविद्यालय बंद करण्याची परवानगी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने दिली. ४४ महाविद्यालयाने एआयसीटीईचे नियम भंग केल्यामुळे त्यांची मान्यता रद्द करण्यात आली. गेल्या नऊ वर्षात सर्वांधिक महाविद्यालये यंदा बंद करण्यात आली. बंद केलेल्या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रथम वर्षात प्रवेश दिला जाणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी प्रवेश घेतला आहे त्यांचा अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत महाविद्यालय सुरु राहिली. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनाची मान्यता देण्यात येणार आहे.

फार्मसी, आर्किटेक्चरच्या १ लाख ९ हजार जागा रद्द

सर्वेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आकिटेक्चर महाविद्यालयांना काउंसिल ऑफ आर्किटेक्चरची परवानगी आवश्यक आहे.  तर फार्मसी महाविद्यालयांना काउंसिल ऑफ इंडीयाची मान्यात लागते. त्यामुळे अनेक महाविद्यालयांनी एआयसीटीईची संलग्नता रद्द केली आहे. त्यामुळे १ लाख ९ हजार जागा कमी झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा कल फार्मसी, आर्किटेक्चर अभ्यासक्रमाकडे कमी झाल्यामुळे जागा कमी करण्यात आल्या. या जागा अधिकृत संस्थानी नियंत्रिक केल्या आहेत.  

विद्यार्थ्यांची कमतरता असल्यामुळे ७६२ महाविद्यालांनी विविध कोर्सेस बंद केली आहेत. त्यामुळे ६९ हजार जागा कमी झाल्या आहेत. मात्र दिलासादायक बाब म्हणजे एआयसीटीईने  २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात १६४ नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. त्यामुळे ३९ हजार जागा वाढल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News