कोरोनाच्या संकटात १७,७१५ तरूणांना मिळाला रोजगार !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 July 2020
  • कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली नोकरी गमावली, तसेच काहीनी सरळ गावाचा रस्ता धरला.
  • पण मागील तीन महिन्यात कौशल्य विकास विभागामार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ऑनलाइन मेळावे घेतले.

कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली नोकरी गमावली, तसेच काहीनी सरळ गावाचा रस्ता धरला. पण मागील तीन महिन्यात कौशल्य विकास विभागामार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ऑनलाइन मेळावे घेतले. त्याचबरोबर महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल  १७,७१५ तरूणांना रोजगार मिळवून दिला आहे. मागीन तीन महिन्याच्या काळावधीत १ लाख ७२ हजार १६५ तरूणांनी नोकरीसाठी नोंदणी केल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

कामगार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाकडून वेबपोर्टल सुरू करण्यात आलं आहे. बेरोजगार तरूणांनी आपल्या शिक्षणासह नोकरीसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे उद्योजकांना पात्रतेप्रमाणे कामगार शोधण्यास मदत झाली आहे. ज्या तरूणांनी अजून नोंदणी केलेली नाही, अशा तरूणांनी रोजगारासाठी आजचं नोंदणी करावी. अधिकृत संकेतस्थळावर दिलेली योग्य माहिती भरा आणि नोकरी मिळवा. मागील तीन महिन्यांपासून १७,७१५ तरूणांना वेबसाईटच्या माध्यमातून नोकरी मिळाली आहे असे माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. 

नोकरीसाठी झालेली नोंदणी            इत्यादी तरूणांना नोकरी मिळाली 

मुंबई विभाग - २४,५२०,                                ३,७२०
नाशिक - ३०,१४५,                                         ४८२
पुणे - ३७,५६२,                                         १०,३१७
औरंगाबाद - ३५,२४३,                                  १,५६९
अमरावती - १४,२६०                                    १,०२२
नागपूर विभाग - ३०,४३५                                   २३ 

कौशल्य विकास विभागाने आॅनलाइन रोजगार मेळाव्यांची मोहीम तीन महिने राबिविली. जिल्हास्तरावर २४ आॅनलाइन रोजगार मेळावे घेण्यात आले. विशेष म्हणजे ऑनलाइन मेळाव्यांमध्ये १६७ उद्योजक समाविष्ठ झाले होते. त्यांनी १६,११७ जागांसाठी ऑनलाइन मुलाखती घेतल्या. झालेल्या २४ मेळाव्यांमध्ये ४०,२२९ गरजू तरूणांनी सहभाग नोंदविला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News