१४ वर्षाची तरुणी झाली आई, ११ वर्षाचा तरुण झाला बाप; वाचा! कसे जुळले प्रेम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020

जानेवारी २०२० मध्ये तरुणीने स्वत: गर्भवती असल्याची माहिती सोशल माध्यमात दिली होती. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. डारिया आता आई झाली, त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

प्रेमाला वय नसत, आणि वयाला प्रेमाच्या मर्यादा... प्रेम हे कुठे? आणि केव्हा होईल हे सांगने कठीन आहे. अवघ्या १२ व्या वर्षी ही तरुणी ९ वर्ष वय असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. वर्षभर दोघांच्या गाटीभेटी सुरु झाल्या. एकमेकांसोबत खेळने, राहणे सुरु होते, नकळत दोघांच्या हातून एक धक्कादायक घटना घडली. १३ व्या वर्षी तरुणी प्रेग्नेंट झाली आणि १४ व्या वर्षी तरुणीला मुलगा झाला. सध्या मुलाच्या बापाच वय ११ वर्ष आहे. रशियातील मास्को शहरात ही घळबळजनक घटना घडली. जगातल्या प्रमुख आघाडीच्या वृत्तसंस्थानी ही बातमी प्रसिद्ध केली.  

जानेवारी २०२० मध्ये तरुणीने स्वत: गर्भवती असल्याची माहिती सोशल माध्यमात दिली होती. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. डारिया आता आई झाली, त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर डारियाचे सध्या ४ लाख फॉलोयर्स आहेत. डारियाने सोशल मीडियावर सांगितले की, रशियातील रुढीपरंपरेनुसार जन्मलेल्या बाळाचा चेहरा ४० दिवस कोणालाही दाखवणार नाही, मात्र डारियाने प्रस्तुतीचा एक अनुभवर आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर शेअर केला. प्रस्तुतीच्या वेळी खुप वेदना सहन कराव्या लागतात अस अनेकांकडून ऐकलं होत मात्र बाळाच्या आनंदासाठी थोड्या वेदना सहन केल्या तर वेदनेच दु:ख वाटणार नाही, बाळाच्या स्पर्शासाठी मी अस्वस्त होते अचानकपणे माझ्या जवळ बाळाला आणून ठेवले आणि मी बेशुद्ध झाले. बाळात स्पर्श मला उल्हासदायक वाटला असे डायरियाने सांगितले.  

रशियामध्ये शारिरीक संबंधाचे वय १६ वर्षे आहे. मात्र या प्रेमी युगलांनी अल्पवयातच शारिरीक संबंध ठेवले असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला, मुलाचे वय ११ वर्षे असल्यामुळे मुलगी गर्भवती कशी झाली? असा प्रश्न नागरिकांनी व्यक्त केला, यावर वैद्याकीय अधिकारी आश्चर्यचकीत झाले. १२ वर्षापासून मुलांमध्ये सुक्रानू विकसीत होतात मात्र ११ व्या वर्षी मुलामध्ये शुक्रानू कसे निर्माण झाले याचा शोध डॉक्टर घेत आहेत. ११ वर्षाचा मुलगा बाळाचा बाप आहे असा दावा डारियाने केला, त्यावर रशियन पोलिसांनी आई- वडिलांडे डीएनए तपासणीसाठी घेतले आहेत, पुढील तपास पोलिस आणि वैद्याकीय अधिकारी करत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News