होमगार्डसाठी शासनाकडून 100 कोटी; तर रेल्वेकडून 2000 गार्ड कपात

यिनबझ टीम
Tuesday, 25 February 2020

मुंबई - काल (दि. 24 फेब्रुवारी) मुंबईच्या आझाद मैदान येथे सुरू असलेल्या होमगार्डच्या आंदोलनाला अखेर न्याय मिळाला आहे. राज्य शासनाकडून होमगार्डच्या मानधनासाठी 100 कोटींची तरतुद केली आहे, तर राज्यातल्या 40 हजार होमगार्डची सुरक्षा लवकरच पुर्ववत होणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे.

मुंबई - काल (दि. 24 फेब्रुवारी) मुंबईच्या आझाद मैदान येथे सुरू असलेल्या होमगार्डच्या आंदोलनाला अखेर न्याय मिळाला आहे. राज्य शासनाकडून होमगार्डच्या मानधनासाठी 100 कोटींची तरतुद केली आहे, तर राज्यातल्या 40 हजार होमगार्डची सुरक्षा लवकरच पुर्ववत होणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे.

सध्यस्थितीत होमगार्ड यांना राज्य शासनाकडून दिवसा 670 रुपये या तत्वावर पगार दिला जातो. मात्र राज्य शासनाकडून थकलेल्या रक्कमेमुळे गेल्या महिण्याभरापासून काही होमगार्डचा पगार मिळाला नव्हता. त्यामुळे काही ठिकाणीच्या होमगार्डंनी काम बंद आंजदोलन केले होते, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण जाणवू लागला होता. सोबतच अनेक तरुण - तरुणींच्या रोजगाराचा प्रश्नही भेडसावत होता. सध्या अनेक रेल्वे स्थानक, उपनगरिय रेल्वेतील महिला डब्बे, वाहतुक पोलिसांच्या मदतीला, तुरुंगातील सुरक्षा तसेच अनेक ठिकाणी होमगार्ड यांची सुरक्षा तैनात केली जाते. यासाठी असलेल्या 1500 होमगार्डची सेवा लवकरच पुर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती संजय पांडे यांनी दिली. 

राज्य शासनाकडून होमगार्ड यांच्या मानधनासाठी 100 कोटींची तरतुद करण्यात आली आहे, त्यामुळे हा निधी प्राप्त होताच अनेक थकित होमगार्ड यांचे मानधन देण्याचे नियोजन करण्यात येईल. या प्रक्रियेला थोडा उशीर जरी लागला तरी त्यांची सेवा पुर्ववत करण्यात येणार असल्याचे मत होमगार्डचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News