१३ वर्षीय मुलीवर घरात कात्रीने वार करून अत्याचार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 August 2020
  • दिल्ली पुन्हा हादरली ! दिल्लीत पीरागढी परिसरात एका १३ वर्षीय मुलीवर तिच्या घरात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • मुलगी घरात एकटीच होती, त्याचवेळी नराधमांनी डाव साधून घरात घुसून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली :- दिल्ली पुन्हा हादरली ! दिल्लीत पीरागढी परिसरात एका १३ वर्षीय मुलीवर तिच्या घरात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी घरात एकटीच होती, त्याचवेळी नराधमांनी डाव साधून घरात घुसून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रतिकार करण्यास सुरूवात केली तर, त्या नराधमांनी तिच्या पोटात कात्री भोसकली. मुलगी गंभीर जखमी अवस्थेत सरकत शेजारील फ्लॅटपर्यंत पोहोचली. दरवाजा वाजवून तिने शेजाऱ्यांना बोलवून घेतले. मग त्यांना सर्व हकिकत सांगत असतानाच ती बेशुद्ध पडली. त्यांनी या घटनेची सर्व माहिती पोलिसांना दिली. ही भयानक घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. परंतु पीडीतेवर रूग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. तिने दिलेल्या जबाबानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पीडित मुलीचे कुटुंब हे मूळचे बिहारचे आहे. कामानिमित्त ते दिल्लीत स्थलांतरीत झाले आहेत. पीडित मुलीचे आई-वडील आणि बहीण तिकडच्याच जवळच्या कंपनीत मजूराचे काम करतात. त्यामुळे पीडित दिवसभर घरात एकटीच राहात होती. याच संधीचा फायदा त्या नराधमांनी घेतला आणि तिला आपल्या वासनेचं शिकार केले. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ती घरात एकटीच होती. तेव्हा दोन तरूण तिच्या घरात घुसले आणि त्यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या नराधमांनी तिला बेदम मारहाण केली एवढंच नाही तर शरीरावर कात्रीने वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारात बेशुद्ध झालेली पीडिता मृत झाल्याचे समजून आरोपी पसार झाले.

पण थोड्या वेळात शुद्धीवर आलेल्या पीडित मुलीने गंभीर जखमी अवस्थेत ती सरकत शेजारच्या दरवाजापर्यंत गेली. कसाबसा दरवाजा उघडून तिने मदतीसाठी शेजाऱ्यांना आवाज दिला. तिची अवस्था बघून सगळेच घाबरले. तिला तातडीने रुगणालयात दाखल करण्यात आले. दरम्यान मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत दोन आरोपींची नावे सांगितली आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे, आता या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. नराधमांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

 

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News