बेळगाव विभागाचा बारावीचा निकाल जाहीर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 July 2020

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चिकोडी आणि बेळगाव विभागाचा निकाल समाधान कारक लागला आहे, त्यामुळे राज्यभर दोन्ही विभागांचे कौतूक केले जात आहे. 

बेळगाव विभागाचा बारावीचा निकाल जाहीर 

बेळगाव - कोरोनाचा देशभरात कहर झाल्याने दहावी आणि बारावीच्या झालेल्या परीक्षांचे पेपर तपासणी करण्यास राज्यांना अनेक अडचणी आल्या. तसेच दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणारे निकाल जाहीर न झाल्याने पालक आणि विद्यार्थी दोघेही चिंतेत होते. पण बेळगाव बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर करून पालकांना एक सुखद धक्का दिला. 

कोरोनामुळे रखडलेला निकाल पदवीपूर्व विभागाने नुकताच जाहीर केला आहे, त्यामध्ये बेळगाव विभागाचा निकाल ५९.७ टक्के तर चिकोडी शैक्षणिक विभागाचा निकाल ६३.८८ टक्के लागला आहे. निकालामध्ये राज्यात चिकोडी २० व्या क्रमांकावर तर बेळगाव २७ व्या क्रमांकावर आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चिकोडी आणि बेळगाव विभागाचा निकाल समाधान कारक लागला आहे, त्यामुळे राज्यभर दोन्ही विभागांचे कौतूक केले जात आहे. 

मंगळवारी दुपारी साडेअकरा वाजता पदवीपूर्व शिक्षण विभागाने अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केला. उड्डपी जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे, तर कन्नड दुस-याक्रमांकावर आहे, अधिक माहितीसाठी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News