11 वी प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सुरु ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020
  • कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करता येणार

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे संकेतस्थळ 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करता येणार आहे. दक्षिण, पश्‍चिम आणि उत्तर मुंबईतील महाविद्यालये 1 जुलैला; तर ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर महापालिकेतील महाविद्यालये 2 जुलैला वेबसाइटवर नोंदणी करू शकतात.

तसेच यंदाच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती देण्यासाठी विभागनिहाय ऑनलाईन प्रशिक्षणही आयोजित केले आहे. meet. google.com/ktb-cwsq-dmq या गुगल लिंकद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले.
अकरावी प्रवेशाची वेबसाइट-http://mumbai.11thadmission.org.in

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News