'या' तालुक्यात एकाच दिवशी ११ पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 26 May 2020

"बाधित रुग्ण असलेल्या गावांमध्ये कडक तीन दिवसांचा लॉकडाऊन पाळावा म्हणजे संसर्गाची ही साखळी खंडित होईल. तसेच इतर गावांच्या ग्रामदक्षता समित्या आणि ग्रामस्थांनीही योग्य ती दक्षता व खबरदारी घ्यावी. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क फर्स्ट कॉन्टॅक्टमधील लोकांची संख्या अशी मुगळी- सात, दौलतवाडी -चार, हमिदवाडा-दोन, आलाबाद- तीन, मळगे खुर्द-सहा व अनुर- चार अशी एकूण २६ संख्या आहे. तसेच या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या या गावांमधील सेकंड कॉन्टॅक्टची संख्या ४० इतकी आहे. या सर्वांना कागलच्या कोविद सेंटरमध्ये संस्थात्मक अलगीकरणमध्ये ठेवून योग्य ते उपचार करावे" 

या तालुक्यात एकाच दिवशी ११ पॉझिटिव्ह

कोल्हापूर - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने परिस्थितीनुसार लॉकडाउन सुरू ठेवले. कोल्हापूर जिल्ह्यातील आकडा मागील काही दिवसांपासून वाढत असल्याचा आपण पाहतोय, त्यातच काल कागल मध्ये एकाच दिवशी ११ पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक बोलवून योग्य त्या सुचना दिल्या. 

अद्याप कागल मध्ये एकही रूग्ण आढळला नव्हता. मुंबईहून गावी आलेल्या एका व्यक्तीमुळे एकूण ११ जण पॉझिटिव्ह असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सांगितले. संसर्गित रुग्ण तालुक्यातील सोनगे गावात आढळला होता. त्यानंतर आज एकाच दिवशी दहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शासकीय यंत्रणा हादरली. यामध्ये मुगळी-पाच, दौलतवाडी -दोन व हमिदवाडा, आलाबाद, मळगे खुर्द, अनुर या गावांमधील प्रत्येकी एक असे एकूण अकरा रुग्ण आहेत. 

तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळा

"बाधित रुग्ण असलेल्या गावांमध्ये कडक तीन दिवसांचा लॉकडाऊन पाळावा म्हणजे संसर्गाची ही साखळी खंडित होईल. तसेच इतर गावांच्या ग्रामदक्षता समित्या आणि ग्रामस्थांनीही योग्य ती दक्षता व खबरदारी घ्यावी. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क फर्स्ट कॉन्टॅक्टमधील लोकांची संख्या अशी मुगळी- सात, दौलतवाडी -चार, हमिदवाडा-दोन, आलाबाद- तीन, मळगे खुर्द-सहा व अनुर- चार अशी एकूण २६ संख्या आहे. तसेच या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या या गावांमधील सेकंड कॉन्टॅक्टची संख्या ४० इतकी आहे. या सर्वांना कागलच्या कोविद सेंटरमध्ये संस्थात्मक अलगीकरणमध्ये ठेवून योग्य ते उपचार करावे" 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News