स्वातंत्र्य भारत ते आतापर्यंत एकही मतदान न चुकवलेला 102 वर्षांचा मतदार, एकदा पहाच...

सुरज पाटील (यिनबझ)
Monday, 29 April 2019

देशात असे कित्येक सुजान नागरिक आहेत, जे प्रामाणिकपणे मतदन करतात. अशाच एका व्यक्तीचा जीवनप्रवास आपण पहाणार आहोत, ज्यांनी स्वातंत्र्य भारताची म्हणजेच 1951ची पहिली निवडणूक ते आतापर्यंत होणाऱ्या हरएक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे...

देशात असे कित्येक सुजान नागरिक आहेत, जे प्रामाणिकपणे मतदन करतात. अशाच एका व्यक्तीचा जीवनप्रवास आपण पहाणार आहोत, ज्यांनी स्वातंत्र्य भारताची म्हणजेच 1951ची पहिली निवडणूक ते आतापर्यंत होणाऱ्या हरएक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. ते म्हणजे श्याम सरण नेगी. श्याम हे सध्या 102 वर्षांचे आहेत. तरी मतदानाला घेऊन त्यांचा असलेला जोश एकदम खूपच. 

सुरकुतलेला चेहरा, क्षीण झालेलं शरिर, बोलणं थोडं थकलेलं आणि देशातला सगळ्यात वयोयवृध्द मतदार. 102 वर्षांचे असल्याने श्माम यांना कोणताही आधार नसताना चालतासुध्दा येत नाही. त्यामुळे सोबत काठी घेऊन ते थोडे थोडे अंतर चालत असतात. श्याम हे सध्या शिमल्यापासून 280 किलोमीटर लांब बर्फाळ प्रदेश असलेल्या किन्नर जिल्हातील कल्पा गावात राहतात. 

जन्म - 1 जुलै 1917
नोकरी - शिक्षक
ठिकाण - शेजरच्या गावात, म्हणजेच मुरांग 
पगार - 700 रुपये
पहिलं मतदान - 25 ऑक्टोबर 1951

श्याम यांची स्वातंत्र्यानंतरचं पहिलं मतदान...
श्याम हे आपलं पहिलं मत नोंदवण्यासाठी 25 ऑक्टोबर 1951 रोजी  सकाळी सहा वाजता कल्पा या गावी गेले. त्यावेळचे चिन्नी गाव म्हणजेच आताचे कल्पा. नेगी यांना आपलं मत नोंदवून आपल्या शाळेत म्हणजे आठ-दहा किलोमीटर जाऊन मतदान नोंदवून घ्यायचं होतं. मतदानाची सुरूवात सात वाजता होणार होती, पण तेथील अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर ठराविक वेळेच्या आर्धा तास आधी म्हणजेच साडे सहा वाजता माझं पहिल्या स्वातंत्र्य भारताचं देशात पहिलं मत नोंदवलं गेलं. 

देशाच्या पहिल्या मतदाराची अशी भन्नाट सुरूवात नेगी यांच्या हाताने झाल्यामुळे नेगींनी देखील कधी आपलं मतदान चुकवलं नाही. ग्रामपंचायत निवडणूकीपासून ते विधानसभा, लोकसभांच्या निवडणूकांमध्ये नेगींनी आपलं हक्काचं मत नोंदवलंच. 

श्याम सरण नेगी आजही अभिमानाने सांगतात की...
श्याम नेगी आजही आपल्या पहिल्या मतदानाची गोष्ट अभिमानाने सगळ्यांना सागतात. ते म्हणतात, माझ्यासारखा म्हातारा जर मतदानासाठी जाऊ शकतो, तर दुसरं कोणी का जाऊ शकत नाही. आज नेगी 19 मेची वाट पाहत आहेत. त्यावेळी त्यांच्या कल्पा-15 या मतदार संघातून मतदान होणार आहे. ते म्हणतात, की माझं मत कधीही वाया जाऊ दिलं नाही. मात्र मी यावेळी 102 वर्षांचा आहे. तब्येतही बरी नाही. वाढत्या वयामुळे माझे पायही माझा भार झेलू शकत नाहीत. माझी दृष्टी कमी झाली आहे, मी इथूनपुढे जगेन की नाही, माहित नाही; पण माझं हे मतदानही मी हक्काने करणारचं.

श्याम नेगींना मिळालेले पुरस्कार...
2007 साली जाहीर झालेल्या आयकॉन बनलेल्या मतदारांच्या यादीत नेगींचे सर्वात प्रथम नाव नोंदवण्यात आले.
एकदाही निवडणूक चुकवली नाही म्हणून मुख्य निवडणूक अधीकारी असलेल्या आणि राज्याच्या अतिरिक्त मुख्य असलेल्या सचिव मनिषा नंदा यांनी त्यांचा सत्कार केला.
त्यांच्या या आदर्श कामगिरीबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी नेगींचा सत्कार केला.
लिजेंड वोटर म्हणून नेगी यांना मान्यता मिळाली.
2014 निवडणूकीच्या आधी गुगलने नेगी यांच्यावर एक फिल्म बनवली (Pledge To Vote). 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News