सरकारी बॅंकमध्ये 'या' पदांसाठी १००० जागा रिक्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 September 2020
 • कोणत्याही पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी बॅंकामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालू आहे.
 • विशेषत : बँकांमध्ये ज्यांना नोकरी करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही संधी आहे.

मुंबई :- कोणत्याही पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी बॅंकामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालू आहे. विशेषत : बँकांमध्ये ज्यांना नोकरी करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही संधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये क्लर्क (Government Bank Clerk) पदाच्या हजारो जागांवर भरती प्रक्रिया राबवत आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक रिक्त पदे महाराष्ट्रात आहेत.

या भरतीसाठी नोटिफिकेशन देखील जारी झाले आहे आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीचा तपशील, अर्जाची लिंक, महत्त्वाच्या तारखा इत्यादी माहिती या वृत्तात सविस्तर देत आहोत.

बँकांची नावे :-

बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक

पदांची माहिती :-

एकूण पदे :- २५५६

राज्यनिहाय विविध बँकांमधील रिक्त पदांची संख्या :-

 • उत्तर प्रदेश - २५९
 • उत्तराखंड - ३०
 • राजस्थान - ६८
 • मध्यप्रदेश - १०४
 • बिहार - ९५
 • छत्तीसगड - १८
 • झारखंड – ६७
 • हरियाणा - ७२
 • दिल्ली - ९३
 • महाराष्ट्र - ३७१
 • पश्चिम बंगाल - १५१
 • गुजरात - १३९
 • चंडीगढ़ - ०८
 • गोवा - २५
 • हिमाचल प्रदेश - ४५
 • जम्मू-कश्मीर - ०७
 • दादर नागर हवेली / दमन दीव - ०४
 • कर्नाटक - २२१
 • केरळ - १२०
 • ओडिशा - ६६
 • तामिळनाडु - २२९
 • तेलंगण - ६२
 • त्रिपुरा - १२
 • आंध्रप्रदेश - ८५
 • अरुणाचल प्रदेश - ०१
 • सिक्किम - ०१
 • असाम - २४
 • लक्षद्वीप - ०३
 • मणिपुर - ०३
 • मेघालय - ०१
 • मिझोरम – ०१
 • नगालँड - ०५
 • पुद्दुचेरी – ०४

महत्त्वाच्या तारखा :-

 • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - २ सप्टेंबर २०२०
 • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - २३ सप्टेंबर २०२०
 • अर्जांचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख - २३ सप्टेंबर २०२०
 • ऑनलाइन पूर्व परीक्षेचं कॉल लेटर डाउनलोड करण्याची तारीख - १८ नोव्हेंबर २०२०
 • ऑनलाइन पूर्व परीक्षेची तारीख - ५, १२ आणि १३ डिसेंबर २०२०
 • पूर्व परीक्षेच्या निकालाची घोषणा - ३१ डिसेंबर २०२०
 • ऑनलाइन मुख्य परीक्षा - २४ जानेवारी २०२१

अर्जांचे शुल्क

जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस वर्गाच्या उमेदवारांसाठी ८५० रुपये आणि एससी, एसटी, दिव्यांगांसाठी १७५ रुपये.

आवश्यक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी.

वयोमर्यादा

किमान २० आणि कमाल २८ वर्षे आरक्षित वर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलतीचा लाभ मिळेल.

निवड प्रक्रिया

पूर्व आणि मुख्य परीक्षेचाय आधारे उमेदवारांची निवड होईल. दोन्ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.

IBPS Bank Clerk Vacancy 2020 चे नोटिफिकेशन लिंक :-https://www.ibps.in/wpcontent/uploads/DetailedAdvtCRPClerksX.pdf?_ga=2.69232144.1827836440.1600172788-556984643.1585821921

अर्ज करण्याच्या थेट लिंक :- https://ibpsonline.ibps.in/crpcl10aug20/basic_details.php?_ga=2.3344048.1827836440.1600172788-556984643.1585821921

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News