शंभर परीक्षा केंद्रांवर दहावीचे ३५ हजार १०१ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार

सुहास सदाव्रते
Monday, 2 March 2020

जिल्ह्यातील ३२५ विविध माध्यमाच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी दहावी परीक्षेला सामोरे जाणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील ३५ हजार १०१ विद्यार्थीनी परीक्षेला नोंदणी केलेली आहे. 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंगळवारी सुरू होत आहे. जिल्ह्यातील शंभर परीक्षा केंद्रांवर ३५ हजार १०१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहे. 

जिल्ह्यातील ३२५ विविध माध्यमाच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी दहावी परीक्षेला सामोरे जाणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील ३५ हजार १०१ विद्यार्थीनी परीक्षेला नोंदणी केलेली आहे. 
दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यातील विविध शाळांत शंभर परीक्षा केंद्र असतील. मंडळाच्या वतीने जालना शहरसह प्रत्येक तालुक्यात असे अकरा परिरक्षक कार्यालय नेमण्यात आलेली आहेत. परिरक्षक कार्यालयापासून ते परीक्षा केंद्रावर प्रश्न व उत्तरपत्रिका ने-आण करण्याकरिता सहायक नेमण्यात आले आहेत. या कामासाठी जवळपास दीडशे शिक्षकांना नेमणुका देण्यात आल्या आहेत. 

सहा भरारी पथके 

दहावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरणे; तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहा भरारी पथके कार्यरत राहणार आहे. माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग, निरंतर शिक्षण विभाग, जिल्हा डायट संस्था, महिला पथकाची परीक्षा केंद्रावर नजर राहणार आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या बैठकीत कडक कारवाईबाबत सूचना दिलेल्या आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News