'ही' आहे, कमी वेळेत यूट्यूबवर 30 लाख सब्सक्रायबर असलेली 10 वर्षांची स्टार

सुरज पाटील (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

देशात फेमस होण्यासाठी वय, कोणतीही अट किंवा कोणत्याही गोष्टीची गरज नसते, तर गरज असते ती फक्त कला, कर्तुत्व आणि जीगरबाज असण्याची. अशीच जीगरबाज कलाकार आणि कमी वयात, कमी कालावधीत यूट्यूबवर जास्त फेमस झालेली कलाकार आपल्याला पाहायची आहे.

देशात फेमस होण्यासाठी वय, कोणतीही अट किंवा कोणत्याही गोष्टीची गरज नसते, तर गरज असते ती फक्त कला, कर्तुत्व आणि जीगरबाज असण्याची. अशीच जीगरबाज कलाकार आणि कमी वयात, कमी कालावधीत यूट्यूबवर जास्त फेमस झालेली कलाकार आपल्याला पाहायची आहे. 

ही आहे अन्नत्या. ती फक्त 10 वर्षांची आहे. सध्या ती आणि तिची टीम लहान मुलांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे व्हिडीओ बनवत असते. कधी ती डॉक्टर या रोलमध्ये असते, तर कधी लहान परीच्या रोलच्या माध्यमातून मनोरंजन करत असते. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कमी कालावधीत तीच्या यूट्यूब चॅनेलचे 30 हजार सबस्क्राईब झाले आहेत, तर लाखांच्या वर व्ह्यूवर्स असतात. 

ती काम करत असलेल्या व्हिडीओंची संकल्पना खूद्द तिच्या आईची असते. तर तिचे वडील सर्व व्हिडीओ शूट करत असतात. अन्नत्याचे सर्व व्हिडीओ तिच्या घरामध्ये शूट केले जातात, तर सर्व व्हिडीओ एडिटींग, व्हिडीओ पोस्टींग, व्हिडीओ ग्राफिक्स याप्रकारची सर्व कामे तीच्या घरीच केली जातात. 

पाहा अन्नत्याची संपूर्ण फॅमिली...

अन्नत्या सध्या सातव्या इयत्तेत आहे. तिची शाळेमध्ये असलेली प्रजेंटी ही शंभर टक्के असते, तसेच क्लासमध्ये ती सर्व विद्यार्थ्यांमध्ये हूशार देखील आहे, असं तिचे शिक्षक म्हणतात. तिच्या कलेच्या आदांमुळे ती फक्त 10 वर्षांची आहे, अस कोणालाच वाटत नाही, पण हे खरं आहे की तिच्या आईने शिकवलेल्या आदाकारीमुळे ती इतक्याप्रकारचे काम करू शकते. शाळेमध्येसुध्दा अन्नत्या मोठ्या-मोठ्या फंक्शनमध्ये आपली कला सादर करत असते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News