1 बोट, 11 जण,101 दिवस आणि सेक्स राफ्टवर घडला विचित्र प्रकार

सुरज पाटील
Friday, 5 July 2019

देशात माणसं युध्दाशिवाय जगू शकतात का? हिंसा आणि संघर्ष यांना माणुस कसा हाताळू शकतो, कठीण परिस्थिती ते उग्र होतात का किंवा प्रत्येकात हिंसेची भावना जागृत होते का हे तपासण्यासाठी जगातले अग्रगण्य शास्त्रज्ञ आणि बायोलॉजिकल अॅन्थ्रोपोलॉजी तज्ज्ञ सँटियागो जिनोव्ज यांनी एक प्रयोग करायचा ठरवला.

देशात माणसं युध्दाशिवाय जगू शकतात का? हिंसा आणि संघर्ष यांना माणुस कसा हाताळू शकतो, कठीण परिस्थिती ते उग्र होतात का किंवा प्रत्येकात हिंसेची भावना जागृत होते का हे तपासण्यासाठी जगातले अग्रगण्य शास्त्रज्ञ आणि बायोलॉजिकल अॅन्थ्रोपोलॉजी तज्ज्ञ सँटियागो जिनोव्ज यांनी एक प्रयोग करायचा ठरवला.

सर जिनोव्ज यांनी 1973 साली जगभरात वर्तमानपत्राद्वारे एक जाहिरात दिली. ज्या जाहीरातीमध्ये डिक्लेर करण्यात आलं की एका प्रयोगाच्या नियोजनासाठी ३ महिन्यांसाठी असे महिला व पुरुष हवे आहेत, जे स्वत:ला सिध्द करण्यासाठी तयार आहेत. यात 25 ते 40 वयोगटातील महिला आणि पुरुष सहभागी होऊ शकतात. या जाहिरातीला उत्तर म्हणून हजारो महिला पुरुषांचे अर्ज आले, मात्र त्यातील 10 लोकांना (6 महिला, 4 पुरुष) नियुक्त करण्यात आले. या दहा इतर महिला पुरुषांसोबत सर जिनोव्ज यांचा देखील समावेश होता. 

 

अशी झाली नियुक्ती...
निवड झालेले 10 जणांची एका विशिष्ट पध्दतीने नियुक्त करण्यात आली होती. नागरिकत्व, धर्म आणि सामाजिक दृष्टीकोन अशा विविध पध्दतीने 10 जणांची निवड करण्यात आली होती. 

कसा होता प्रयोगाचा प्रवास...
10 जणांसोबत स्वत: जिनोव्ज यांनी या प्रयोगासाठी 3 महिन्यांचा समुद्री प्रवास सुरू केला. प्रवास होता, कॅनरी बेटापासून मेक्सिकोपर्यंत. जिनोव्ज यांनी 12 बाय 7 मीटर एक राफ्ट (समुद्री पाण्यावर तरंगणारं घर) बनवली. ज्यात विज नव्हती, इंजिन नव्हतं आणि मदतीसाठी कोणतीच बोट नव्हती. या राफ्टमध्ये फक्त झोपता येण्याची सोय होती.

प्रयोग असफल झाला...
तीन महिन्याच्या प्रयोगापैकी 51 व्या दिवशी जिनोव्ज नाराज झाले होते. कारण ज्या उद्देशाने हा प्रयोग सुरू करण्यात आला होता, तो उद्देश असफल झाला होतो. त्या दहा जणांमध्ये तणाव, आक्रमकता, निराशाची निर्मीती होण्यापेक्षा त्यांच्यात एक भावनात्मक जोड निर्माण झाली. माणूस युध्दाशिवाय जगू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर या प्रयोगात मिळालं नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News