‘सौरव गांगुलीने मला जे २००८ मध्ये सांगितले होते, ते मला आज सुध्दा आठवते - मॅक्युलम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 10 September 2020

‘सौरव गांगुलीने मला जे २००८ मध्ये सांगितले होते, ते मला आज सुध्दा आठवते - मॅक्युलम

‘सौरव गांगुलीने मला जे २००८ मध्ये सांगितले होते, ते मला आज सुध्दा आठवते - मॅक्युलम

आयपीएलला २००८ मध्ये भारतात सुरूवात झाली. तेव्हा या स्पर्धेचं महत्त्व इतकं वाढेल, किंवा जगभर त्याची प्रसिध्दी होईल याची कल्पना सुध्दा केली नव्हती. तसेच सुरूवातीला चाहते या स्पर्धेला किती महत्त्व देतील याची सुध्दा चिंता वाटतं होती. त्यानंतर ब्रॅड मॅक्युलम याने एका सामन्यात ७३ चेंडूत नाबाद १५८ धावा फटकावल्या आणि स्पर्धेतली रोमांचकता चाहत्यांना दाखवून दिली.

या स्पर्धेला मोठ्या सुरवातीची गरज होती आणि ती न्यूझीलंडच्या ब्रॅड मॅक्युलम (२६) याने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर करून दिली. कारण त्याने केवळ 73 चेंडूत नाबाद 158 धावा फटकावल्या. मॅक्युलमने त्याच्या वेगवान खेळीत १३ उत्तुंग षटकार आणि १० चौकार ठोकले ज्यामुळे केकेआर हा संघ त्यावेळी २२२/३ पर्यंत पोहोचला.

इतक्या धावा झाल्यानंतर हा सामना एकतर्फी होतोय की समोरून प्रतिकार होईल, अशा अवस्थेत असताना ८२ धावांवर यजमान संघ बाद झाला. मॅक्युलम आता त्याच फ्रँचायझीचा मुख्य प्रशिक्षक असून त्याने याची आठवण करून दिली आहे.

“मी त्यावेळी अगदी लहान होतो, तेव्हा माझ्या खेळीने शाहरुख खानचा प्रचंड आश्चर्यचकित झाला होता. माझ्या क्रिकेट टीममधील सुपरस्टार्सभोवतीदेखील मी इतके खोलवर गेलो होतो की, आमच्या क्रिकेट संघाचा मालक असलेल्या मेगास्टारला सोडून द्या! ‘तुमचे आयुष्य कायमचे बदलले आहे’, आणि त्यावेळी त्याचा अर्थ काय हे मला ठाऊक नव्हते. असं गांगुलीने ब्रॅड मॅक्युलम सांगितले होते.

त्या मॅचनंतर “शाहरुख, ब्रॅड मॅक्युलम म्हणाला होती की ‘आपण नेहमीच नाइट रायडर्सबरोबर असाल.’ फ्रँचायझीने माझ्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ आहे. म्हणून जेव्हा पुन्हा संधी निर्माण झाली त्यामुळे अगदी आनंदी आहे. असंही  ब्रॅड मॅक्युलम याने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News