युवक कॉंग्रेस कार्यकारिणीत ‘हा’ नवा फेरबदल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 July 2020

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले असून, नवीन चेहऱ्यांना आणि महिलांना संधी देण्यात आली आहे. अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर केलेल्या या नव्या कार्यकारिणीत प्रामुख्याने सामान्य घरातील नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, त्यापैकी ३३ टक्के जागांवर महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

मुंबई :- महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले असून, नवीन चेहऱ्यांना आणि महिलांना संधी देण्यात आली आहे. अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर केलेल्या या नव्या कार्यकारिणीत प्रामुख्याने सामान्य घरातील नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, त्यापैकी ३३ टक्के जागांवर महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

मागील कार्यकारिणीतील ब्रिजकिशोर दत्त व शिवराज मोरे यांच्या चांगल्या कामगिरीच्या आधारावर प्रदेश उपाध्यक्षपदी पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय सरचिटणीसपदी ९ जणांना पदोन्नती, तर ८ जणांची नवीन नियुक्ती केली असून, ३१ नवीन सेक्रेटरी घेतले आहेत. याखेरीज प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया, विधी विभाग, रिसर्च डिपार्टमेंट, शिक्षण आणि विद्यापीठ विभाग, कामगार संघटन, क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग, संपर्क आणि समन्वय, शिष्टाचार अशा विविध समित्यांवर नवीन नियुक्‍त्या आणि पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी युवती कॉंग्रेसची स्थापना हे या कार्यकारिणीचे वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवत आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास आणि प्रभारी हरपाल सिंह यांच्या मान्यतेने ही युवक कॉंग्रेसची प्रदेश कार्यकारिणी आज जाहीर केली. सरचिटणीसपदी आमदार ऋतुराज पाटील, मधुकर नाईक, सोनालक्ष्मी घाग, नीरज लोणारे, प्रेरणा वरपूडकर, अश्‍विनी आहेर, निखिल कांबळे, निखिल कविश्‍वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News