अकरावी प्रवेश प्रक्रियेत 'हा' नविन गोंधळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020
  • अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत हा नविन गोँधळ सुरू झाला आहे.
  • त्यामुळे पालक आणि महाविद्यालयांत वादाचे प्रकार घडत आहेत.

मुंबई :- अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत हा नविन गोँधळ सुरू झाला आहे. त्यामुळे पालक आणि महाविद्यालयांत वादाचे प्रकार घडत आहेत. अकरावी प्रवेशात कोट्यातील प्रवेश कर्न्फम करण्यासाठी ओटीपी बंधनकारक असल्याने महाविद्यालयांचे प्रतिनिधी विद्यार्थींना आणि पालकांना कॉल करून ओटीपी घेऊन प्रवेश कर्न्फम करावा लागत आहे. परंतु अनेक पालक ओटीपी देत नसल्याने गोंधळाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा ओटीपीवरून पालक आणि महाविद्यालयांत वादाचे प्रकार घडत आहे.

अकरावीच्या अल्पसंख्याक आणि ‘इन हाउस’ कोट्यातील प्रवेश प्रक्रियेतील ‘ओटीपी’ या पर्यायाचा, या गोंधळामुळे मुंबईतील नामांकित कॉलेजांमध्ये सात दिवसांच्या अवधीत अकरावीच्या कोट्यातील जागांपैकी अवघे दोन ते पाच टक्केच प्रवेश अपलोड होऊ शकलेले आहे. एका नामांकित कॉलेजात ६०० पेक्षा जास्त जागा असून त्या महाविद्यालयातील अवघे दहाच प्रवेश पूर्ण होऊ शकले आहेत.  मुदत वाढवली असली तरी ती महाविद्यालयांच्या कामाची नसल्याने महाविद्यालयातून अकरावी प्रवेश यंत्रणेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. नव्याने दिलेल्या यंत्रणेला काहीच अनुभव नसल्याने आणि शिक्षण संचालक माहितीअभावी परिपत्रक जारी करत आहेत. अशा तक्रारी येत आहेत.

अल्पसंख्याक आणि इन हाऊस कोट्यातील प्रवेश करण्यासाठी अवघा सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. यातच ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक किचकट केली आहे. या प्रक्रियेत केलेल्या बदलामुळे महाविद्यालयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विभागाने ‘ओटीपी’ची पायरी वगळावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र असोशिएशन ऑफ मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स’ने शिक्षण संचालकांकडे पत्राद्वारे केली होती.  पण ही पायरी न वगळता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जर ही पायरी वगळली नाही तर प्रवेश प्रक्रियेस होणार्‍या उशीरास संस्था जबाबदार नसेल,  असेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केले होते. यानंतरही सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. यापूर्वी कोट्यातील प्रक्रिया कॉलेजस्तरावर होत होती. यात विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे ते ऑनलाइन अर्जात कळवणे आवश्यक होते. आता मात्र शिक्षण विभागाने कॉलेजांना यादी पाठवली आहे.

त्यातील विद्यार्थ्यांचेच प्रवेश महाविद्यालय करू शकणार आहेत. यातच प्रवेश अंतिम करताना विद्यार्थ्याच्या मोबाइलवर ‘ओटीपी’ पाठवला जातो. हा ओटीपी कॉलेजमधून विद्यार्थ्याला फोन करून मागून घ्यावा लागतो. यामुळे शहरातील अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये प्रवेश पूर्ण होऊ शकलेले नाहीत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News