भारतीय क्रीडा प्राधिकरणात खेळाडूंच्या सुरक्षेसाठी ‘ही’ उपाययोजना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 26 July 2020
  • कोरोनाचे रुग्ण कर्नाटकात विशेषतः बंगळूरमध्ये वाढत आहेत.
  • त्यापासून क्रीडा प्राधिकरणाच्या बंगळूर केंद्रात असलेल्या खेळाडू आणि मार्गदर्शकांचा बचाव करण्यासाठी कलर कोडचा वापर करण्यात येत आहे.

नवी दिल्ली :- कोरोनाचे रुग्ण कर्नाटकात विशेषतः बंगळूरमध्ये वाढत आहेत. त्यापासून क्रीडा प्राधिकरणाच्या बंगळूर केंद्रात असलेल्या खेळाडू आणि मार्गदर्शकांचा बचाव करण्यासाठी कलर कोडचा वापर करण्यात येत आहे.

कोरोनाचे रुग्ण देशात वाढत असताना क्रीडा शिबिर सुरुवात करणे धोकादायक आहे. त्या वेळी एखादी जरी चूक झाली, तरी गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल, याची क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांना पूर्ण जाणीव आहे. त्यासाठीच ते आता आगळे उपाय आणत आहेत.

बंगळूर येथील क्रीडा प्राधिकरणात कलर कोडचा प्रभावी वापर सुरू झाला आहे. येथे काही महिन्यांपूर्वी कुकला कोरोना झाल्यामुळे खळबळ माजली होती. पतियाळातील राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण संस्थेतील अधिकाऱ्यांनी थेट अडथळेच तयार केले आहेत.

मैदानावरील कर्मचाऱ्यांना सराव सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर आपले काम पूर्ण करावे लागते, त्याच वेळी आरोग्य केंद्रात जाण्यासाठी खेळाडूंना मार्गदर्शकांची पूर्वपरवानगी आवश्‍यक आहे; तसेच मार्गदर्शकांना त्याच्या नोंदी बंधनकारक आहे. निवासी कर्मचारी तसेच मार्गदर्शकांना प्रशासकीय इमारतीत प्रवेश नाही. खेळाडू आणि मार्गदर्शकांसाठी आलेले कुरियर 24 तास गार्ड कक्षेतच राहते आणि त्यानंतर सुरक्षा रक्षक खेळाडूंकडे पोहोचवत आहेत.

केंद्रातील कलर कोड

हरित विभाग :- खेळाडू आणि मार्गदर्शकांनाच प्रवेश. खेळाडूंचे हॉस्टेल तसेच सरावाची सुविधा
पिवळा विभाग :- मेस या विभागात निवासी कर्मचाऱ्यांनाच खेळाडू, मार्गदर्शकांव्यतिरिक्त प्रवेश
लाल विभाग :- प्रशासकीय विभाग. या विभागातील कर्मचाऱ्यांना अन्य ठिकाणी जाण्यास प्रतिबंध

रंगीत बॅजेसही

लाल बॅज :- रोज क्रीडा संकुलात येणाऱ्या व्यक्ती
केशरी बॅज :- एक दिवसाआड क्रीडा संकुलात येणाऱ्या व्यक्तींसाठी
हिरवा बॅज :- क्रीडा संकुलात लागणाऱ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी संकुलाबाहेर जाणाऱ्या व्यक्ती
निळा बॅज :- क्रीडा संकुलात काम करणाऱ्यांचे नातेवाईक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News