ती आमच्या गावची...

सायली शर्मिला जितेंद्र साठविलकर
Saturday, 27 July 2019

गळ्यात तिच्या घट्ट वेणी,

जणू वळवळती नागीण

उंच बांधा तिचा ओठ जणू ,

गुलाबाची पाकळी

नजरेनं घायाळ करून ,

शब्दांनी आपलंसं करणारी

अशी ती आमच्या गावची

साधा भोळा स्वभाव अन्
साधं राहणीमान
पण नाकावर जणू रागाचं कुपान
रंगानं सावली पण पाणीदार डोळ्यांची
अशी ती आमच्या गावची

गळ्यात तिच्या घट्ट वेणी,
जणू वळवळती नागीण
उंच बांधा तिचा ओठ जणू ,
गुलाबाची पाकळी
नजरेनं घायाळ करून ,
शब्दांनी आपलंसं करणारी
अशी ती आमच्या गावची

पाहिलं जवा पहिल्यांदा तिला
आन् पाहतच राहिलो
प्रेमात तिच्या दिस-रात बुडालो
अनोळखी वाटेवर आपलसं करणारी
अशी ती आमच्या गावची

होतो स्वप्नात तिच्या मी
नव्हता विचार सत्यात भेटू कधी
भांबावलेल्या क्षणी,
आपुलकीचा विसावा देणारी
अशी ती आमच्या गावची

झुरत राहिलो आठवणीत तिच्या मी
ना कधी केली हिम्मत,
तिला सांगण्याची
पण कबुली देता प्रेमाची,
पटकन कुशीत शिरणारी
अशी ती आमच्या गावची

भेटली आता आयुष्याच्या प्रवासात,
दिल्या अनाभाका सात जन्माच्या
प्रेमाच्या वाटेवर आयुष्यभर
साथ निभावणारी
अशी ती आमच्या गावची

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News