समुद्रकिनारी कपल्सचे अश्लील चाळे; लोकांनी पाहिले आणि..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 February 2020
  • बोरसे बेट या कौटुंबिक समुद्रकिनारी एक कपल अश्लील चाळे करत असल्याचे लोकांच्या नजरेस पडले.

फिलिपिन्स : प्रेमीयुगुलांना एकांत मिळावा यासाठी ते नवनवीन जागेच्या शोधात असतात. समुद्रकिनारे तर जोडप्यांचे आवडते ठिकाण आहे. मात्र काही देशांमध्ये फॅमिली बीच म्हणजेच कौटुंबिक किनारपट्टीची संकल्पना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुले तसेच वृद्धांना समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेता यावा, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. असं असताना देखील अनेकदा प्रेमी युगुल देखील याठिकाणी येत असल्याची घटना फिलिपिन्समधील बोरसे बेट येथे घडली आहे. 

बोरसे बेट या कौटुंबिक समुद्रकिनारी एक कपल अश्लील चाळे करत असल्याचे लोकांच्या नजरेस पडले. बऱ्याच वेळापासून सुरु असणारा हा प्रकार लक्षात येताच लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस आल्यानंतरही या कपल्सचा रोमान्स सुरूच होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. 

पोलिसांच्या माहितीनुसार, दोघेही २६ वर्षांचे आहेत. तरुणीचे नाव जास्मीन नेली असून तरुणाचे नाव अँथनी कॅरिओ असं आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना जामिनावर सोडले आहे. संध्याकाळच्या वेळेस ही घटना घडली. यावेळी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात लहान मुले आणि वृद्ध नागरिक उपस्थित होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले दोघेही नशेत होते. ज्यावेळी त्यांना अटक करण्यात आली त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला. सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणे आणि पोलिसांचे न ऐकल्याचा आरोप देखील या जोडप्यावर करण्यात आला आहे. 

या दोघांना ताब्यात घेल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांनी यांच्यावर न्यायालयात खटला सुरु करण्यात येईल, त्यावेळी जे जोडपे अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांच्या फिलिपिन्समधील करण्यात येणाऱ्या सहलीवर बंदी घालण्यात येईल, असं देखील पोलिसांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News