झरीन खानचा कास्टिंग काउच अनुभव; प्रोजेक्टसाठी दिली होती 'ही' ऑफर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 September 2019

अभिनेत्री झरीन खान हीने स्वतः सोबत झालेल्या कास्टिंग काउचबद्दल मीडियाला सांगितले.

चित्रपटसृष्टीत कास्टिंग काउच बद्दल आपण अनेकदा ऐकले असेलच. या कास्टिंग काउचचा अनुभव आल्याचा खुलासा नुकताच एका बॉलिवूड अभिनेत्रीनेही केला आहे. सलमान खान सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खान हीने स्वतः सोबत झालेल्या कास्टिंग काउचबद्दल मीडियाला सांगितले. दोन वेळा या घटनेला बळी पडल्याचा खुलासा तिने केला. 

एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत देताना झरीन म्हणाली, 'चित्रपटसृष्टीत एन्ट्री करतानाच मला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मला किसींग सीन रिहर्सलमध्येच करायला सांगितलं होता. दिग्दर्शक मला बोलला की, तुला बिनधास्त काम करता आले पाहिजे, करिअरमधील अडथळे दूर करावे लागतील.' पण त्यानंतर त्या दिग्दर्शकाला किसींग सीन रिहर्सलमध्ये करायला नाही म्हटल्याचे झरीनने सांगितले.  

कास्टिंग काउचच्या दुसऱ्या अनुभवाबद्दल झरीन सांगते की, 'चित्रपटसृष्टीत मी स्थान मिळवल्यानंतर मला एका व्यक्तीनं ऑफर दिली होती की, जर मी मैत्रीपेक्षा पुढे जाण्यास उत्सुक असेल तर तो मला काही महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळवून देण्यात मदत करेल… त्यानंतर मी त्याला माझ्यासाठी आत्मसन्मान सगळ्यात महत्त्वाचा असल्याचं सांगितलं होतं.' 

झरीन खानचा पंजाबी चित्रपट 'डाका' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झरीनने व्हाइट क्रॉप टॉप आणि ब्लैक पैजामा परिधान केला होता. या फोटोत झरीनच्या पोटावरचे स्ट्रेच मार्क दिसत होते. या फोटोवरून युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. ज्यानंतर झरीन आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने ट्रोलर्सना सडेतोड उत्तरही दिलं होतं.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News