कोणत्याही स्थानावर खेळण्यास तयार : श्रेयस

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

भारतीय क्रिकेट संघातील स्थान सातत्यपूर्ण धावा करून पक्के करण्याचा माझा प्रयत्न आहे. चांगली कामगिरी करतानाच आपल्या संघाच्या यशात मोलाचा वाटा असावा, असेही लक्ष्य असेल असे श्रेयस अय्यरने सांगितले.

पोर्ट ऑफ स्पेन ः भारतीय क्रिकेट संघातील स्थान सातत्यपूर्ण धावा करून पक्के करण्याचा माझा प्रयत्न आहे. चांगली कामगिरी करतानाच आपल्या संघाच्या यशात मोलाचा वाटा असावा, असेही लक्ष्य असेल असे श्रेयस अय्यरने सांगितले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत पाचव्या क्रमांकावर खेळावयास आलेल्या श्रेयस अय्यरने विराट कोहलीस चांगली साथ दिली. त्यांच्या सव्वाशतकी भागीदारीमुळे भारताने पावणेतीनशेची मजल मारली. श्रेयसने धावांचा वेग चांगला राखल्याने आपल्यावरील दडपण कमी झाले असे विराट कोहलीने सांगितले. भारताच्या अ संघातून वेस्ट इंडिजमध्ये यापूर्वी खेळल्याचा श्रेयसला फायदा झाला. 

आज चांगली कामगिरी झाली. माझी कामगिरी चांगली होईल हा विश्‍वास होता. भारत अ संघाकडून याच स्टेडियमवर खेळलो होतो. त्यामुळे खेळाचे चांगले नियोजन करता आले, असे त्याने सांगितले.

या सामन्यात मी कोणताही धोका पत्करणार नाही असे ठरवले होते. विराटने मला आता मोठ्या भागीदारीची गरज आहे, त्याचबरोबर डावाच्या अंतिम षटकापर्यंत मैदानात असण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले, असे श्रेयस म्हणाला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News