इम्प्रेशन पाडण्यासाठी "नेलकलर ट्रेंड"

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 7 October 2019

रोजच्या धावपळीत नखांकडे पाहायला असा कितीसा वेळ मिळतो? पण एखाद्यावर इम्प्रेशन पडायला, पार्टीमध्ये लक्ष वेधून घ्यायला आणि आपला लुक ॲक्‍सेसरीजशिवाय सुद्धा ग्लॅमरस करायला ही छोटेखानी नखंच कामी येतात. त्यामुळे त्यांच्या ग्रुमिंगवर लक्ष देणं गरजेचं आहेच. अर्थात ट्रेंडमध्ये मिळणारं एखादं नेलपेंट लावलं की नखं सजवली, असं होतं नाही. त्यासाठी सध्या कोणते नेलकलर ट्रेंडमध्ये आहेत, नेलआर्टमध्ये काय इन आहे, हेही माहिती असणं गरजेचं आहे.

रोजच्या धावपळीत नखांकडे पाहायला असा कितीसा वेळ मिळतो? पण एखाद्यावर इम्प्रेशन पडायला, पार्टीमध्ये लक्ष वेधून घ्यायला आणि आपला लुक ॲक्‍सेसरीजशिवाय सुद्धा ग्लॅमरस करायला ही छोटेखानी नखंच कामी येतात. त्यामुळे त्यांच्या ग्रुमिंगवर लक्ष देणं गरजेचं आहेच. अर्थात ट्रेंडमध्ये मिळणारं एखादं नेलपेंट लावलं की नखं सजवली, असं होतं नाही. त्यासाठी सध्या कोणते नेलकलर ट्रेंडमध्ये आहेत, नेलआर्टमध्ये काय इन आहे, हेही माहिती असणं गरजेचं आहे.

‘फर्स्ट इम्प्रेशन इस लास्ट इम्प्रेशन’ असं म्हटलं जातं. एखाद्या पार्टीत, ऑफिसच्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आपली छाप सोडायची असल्यास आपण कपडे, मेकअप, शूज, ज्वेलरी, केस यांच्यावर जास्त लक्ष देतो. कपडे, ॲक्‍सेसरीज, मेकअपप्रमाणे नेल स्टायलिंगचे ट्रेंडसुद्धा दरवर्षी बदलत असतात. अर्थात फक्त नवीन ट्रेंड आलाय, म्हणून नाही तर दरवर्षी येणाऱ्या या नवनवीन ट्रेंड्‌समध्ये काहीतरी गमतीशीर, सुंदर कामही असतं.

नेल स्टायलिंग हे फक्त एक खर्चिक काम नसून एक आर्ट आहे. ‘फक्त नखांना रंग तर लावायचाय’ असा विचार करणाऱ्यांनी एकदा तरी हाताच्या दहाही बोटांना व्यवस्थित, बोटावर रंग न लावता, समान लेअर आणि शाईन असेल अशा प्रकारे नेलपेंट लावून दाखवावं. त्यानंतर त्यावर डिझाईन  केलं जातं, त्याला म्हणतात नेल ‘आर्ट’.

वर्तुळाकार मॅनिक्‍युअर
नखं छोटी ठेवायची म्हणजे कशीही कापून चालणार नाही, त्यांना व्यवस्थित आकार असणंसुद्धा गरजेचं आहे. सध्या नखांचा वर्तुळाकार आकार ट्रेंडमध्ये आहे. मध्यंतरी चौकोनी किंवा आयताकृती आकारात नखं वाढवली जायची. त्याने नखं रुंद दिसायची. पण सध्या तरुणी नाजूक, छोटी नखं ठेवणं पसंत करताहेत. त्यामुळे पार्लरमध्ये मॅनिक्‍युअर करायला जाताना नखांना आवर्जून गोलाकार आकार द्या.

मेटालिक अदा
सध्या नेलकलर्समधला महत्त्वाचा ट्रेंड आहे ‘लिक शेड्‌स’चा. गोल्ड, सिल्व्हर यांच्यासोबतच रेनबो विथ ग्लिटर, धूपछाव इफेक्‍ट सध्या ट्रेंडमध्ये आहेत. शिमर मेटालिक शेड्‌स एरवीही वापरल्या जातात; पण सध्या बाजारात मिरर फिनिशचे मेटालिक नेलपेंट आले आहेत. एखाद्या पत्र्याच्या तुकड्याप्रमाणे यांचा लुक असतो. बाजारात ब्रॅंडेड मेकअपचं सामान मिळणाऱ्या दुकानांमध्ये ही नेलपेंट्‌स उपलब्ध आहेत.

तुम्हाला स्ट्रीट मार्केट किंवा फेरीवाल्यांकडेसुद्धा मेटालिक नेलपेंट मिळतील; पण त्याचा लुक तितकासा आकर्षक नसतो. त्यामुळे अशी स्वस्तात मस्त नेलपेंट्‌स घेताना शेड्‌स नीट तपासा. मिरर फिनिश नेलपेंट हे तुलनेने महाग असतात. साधारणपणे ६०० रुपयांपासून त्यांची किंमत सुरू होते. सध्या ऑनलाईन हे पेंट्‌स उपलब्ध आहेत. तसेच काही निवडक ब्रॅंडेड दुकांनामध्ये तुम्हाला हे नेलपेंट्‌स मिळतील.

छोटी नखं
लांबच लांब नखं वाढवण्याची तुम्हाला आवड असेल, तर जरा थांबा. सध्या हे लाँग नेल्स आऊट ऑफ फॅशन आहेत. सध्या ट्रेंड आहे, व्यवस्थितपणे कापलेल्या छोट्या नखांचा. ‘राक्षसासारखी नखं वाढवून ठेवली आहेत,’ असा सतत घोषा करणाऱ्या पालकांना

खरं तर सुखवणारा हा ट्रेंड. तुम्हाला नखं वाढवायचीच असल्यास मध्यम आकाराची ठेवू शकता; पण लांब नखांचा ट्रेंड आता गेला आहे. छोट्या नखांवर इंग्लिश कलर नेलपेंट छान दिसतात.

कलरफुल ट्रिट
नेलकलरमध्ये सध्या व्हाईट, काळा हे दोन रंग चर्चेत आहेत. अर्थात सगळ्यांनाच दहाही बोटांना काळ्या रंगाचे नेलपेंट लावायला आवडत नाही. अशा वेळी एक-दोन बोटांना काळा रंग आणि बाकीच्या बोटांना न्यूड किंवा ट्रान्सपरंट नेलपेंट लावू शकता. न्यूडसोबत लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, गुलाबी हे कॅंडी शेड सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

मिनिमल नेल डिझाईन
नेलआर्ट कधीच ट्रेंडमधून जात नाही. पण सध्या त्यात कोणते ट्रेंड्‌स आहेत, हे माहिती असणंसुद्धा गरजेचं आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे तुम्ही कुठे जाताय, यावर तुमच्या नखांचं डिझाईन अवलंबून असतं. कॉर्पोरेट लुक लक्षात घेता, सध्या मिनिमल लुकचं नेलआर्टस्‌ ट्रेंडमध्ये आहेत. नेलपेंटवर कॉन्ट्रास शेडचा बहुतेकदा सफेद रंगाची उभ्या, आडव्या किंवा तिरप्या रेषा किंवा ठिबके इतकचं त्याचं स्वरूप असतं.

याशिवाय भौमितिक मेहेंदी शेप, लेसच्या कापडावर असते तशी नाजूकशी डिझाईन सध्या नेलआर्टमध्ये केलं जातं. हे डिझाईन नखांवर आकर्षक दिसतं; पण उठावदार दिसत नाहीत. त्यामुळे पार्टीसोबतच ऑफिसमध्येही तुम्ही सहज कॅरी करू शकता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News