आदर्शचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 11 September 2019
  • "आला रे आला' असे या गाण्याचे नाव आहे. नुकतेच हे गाणं भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या हस्ते लॉंच करण्यात आले आहे.

मुंबई : सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदेची "मोरया', "देवा तुझ्या गाभाऱ्याला'सारखी अनेक गाणी गाजली. या गणपती उत्सवात त्याचे गणपती बाप्पावर आधारित एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. "आला रे आला' असे या गाण्याचे नाव आहे. नुकतेच हे गाणं भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या हस्ते लॉंच करण्यात आले आहे.

आदर्शसोबत हे गाणं गायिका रागिणी कवाथेकर यांनीदेखील गायले आहे. रागिणी आणि डौनी हजारिका यांनी हे गाणं कम्पोज केलं आहे. या गाण्याची निर्मिती पंडित राठोड आणि अलंकृत राठोड यांनी केली आहे. त्यामुळे आदर्शचं हे गाणं कसं असणार हे पाहूया.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News