भीषण पूर परिस्थिती का निर्माण झाली? जाणून घ्या विश्लेषण

प्रा. डॉ. सुभाष कारंडे
Tuesday, 13 August 2019
  • जिल्ह्यांतील १७ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या दरम्यान १२२ दिवसांमध्ये पडणाऱ्या पाऊसापैकी ५० टक्क्यापेक्षा जास्त पाऊस फक्त १० दिवसांमध्ये पडला

१. या जिल्ह्यांतील १७ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या दरम्यान १२२ दिवसांमध्ये पडणाऱ्या पाऊसापैकी ५० टक्क्यापेक्षा जास्त पाऊस फक्त १० दिवसांमध्ये पडला.

२. कागल, करवीर, गडहिंग्लज, शिराळा व भुदरगड तालुक्यांमध्ये ७० टक्क्यापेक्षा जास्त पाऊस १० दिवसांत कोसळला. 

३. सर्वाधिक ९८.५ टक्के पाऊस केवळ १० दिवसांमध्ये कागल तालुक्यामध्ये पडला. म्हणजे १२२ दिवसामध्ये पडणारा पाऊस केवळ १० दिवसात कोसळला. 

४. कृष्णा खोऱ्यातील १७ तालुक्यांमध्ये १ जून ते १० ऑगस्ट या दरम्यान २०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. 

५. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये केवळ १० दिवसांमध्ये अनुक्रमे 49.0 %, 47.2 %  व 41.4 % पाऊस कोसळला. 

६. अल्पकाळात पडलेल्या मोठ्या पावसाने ऑगस्टच्या शेवटी भरणारी धरणे केवळ ५ ते ६ दिवसात पूर्ण भरली.

 ७. मुसळधार पाऊसामुळे धरण व्यवस्थापन यंत्रणा कोलमडल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सोडला गेला. 

८. अल्पकाळात पडलेला मोठा पाऊस, धरणातील मोठा विसर्ग याची योग्य माहिती सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहचविण्याची आपत्कालीन पूर्व सूचना देणारी यंत्रणा या प्रदेशात कोठेही अस्तित्वात नाही. 

९. आलम्टी धरणातून होणारा विसर्ग आणि कृष्णा खोऱ्यात पडलेला पाऊस व धरणातील विसर्ग याचा ताळमेळ घालण्यात अपयश आल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा निचरा होण्यास अडथळा आल्याने पाणी सखल भागामध्ये पसरू लागले व भीषण पूरस्थिती निर्माण झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News