मोहित सुरीच्या ‘मलंग’मध्ये दिसणार अमृता खानविलकर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 September 2019

मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या चित्रपटातील स्टारकास्ट आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसेल.

‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. उत्तम अभिनय आणि कमालीची नृत्यशैली या जोरावर अमृताने आपलं करिअर घडवलं आणि बॉलिवूडमध्येही दमदार एन्ट्री मिळवली. आता नवीन चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये अमृताचा जम बसतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या चित्रपटातील स्टारकास्ट आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसेल. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अमृताची ‘मलंग’ झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील यात शंका नाही. 

अमृताने केवळ चित्रपटच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केलं आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत राहिली आहेच. 'मलंग' मधील अमृताची नेमकी काय भूमिका प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तरी सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असलेली प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री लवकरच याबाबत खुलासा करेल हीच आशा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News