अभिनेत्री उर्वशी सोलंकीने खास नवरात्रीसाठी केलं फोटोशूट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 September 2019
  • खास नवरात्रीसाठी डिझायनर घागरा घालत उर्वशीने केले फोटोशूट  

मुंबई : सध्या सगळीकडेच नवरात्रोत्सवाची धामधूम असताना कलाकार मंडळीही या उत्सवात रमली आहेत. रासगरबा, दांडिया अशा अनेक कार्यक्रमांना सेलिब्रिटी या दिवसांत हजेरी लावतात. शिवाय आपल्या चाहत्यांबरोबर या कार्यक्रमांमध्ये दंग होऊन उत्सव साजरा करतात. पण याव्यतिरिक्त मराठीबरोबरच हिंदी कलाकारांनीही नवरात्रीसाठी खास फोटोशूट केलं आहे.

त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे उर्वशी सोलंकी. उर्वशीने खास नवरात्रीसाठी डिझायनर घागरा घालत फोटोशूट केले आहे. तिचा हा लूक सध्या तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.

उर्वशीने आजवर हिंदी, कन्नड, गुजराथी, भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. नवरात्रीच्या ऐन मोक्‍यावर तिच्या ‘विजयपथ’ या गुजराथी चित्रपटामधील गाणेही प्रदर्शित झाले आहे. एकूणच काय तर सध्या कलाकारांमध्येही नवरात्री फिवर पाहायला मिळत आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News